पाऊस पोहोचला ११५ इंचावर, २४ तासांत केपे केंद्रात सर्वाधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 08:51 PM2023-09-17T20:51:01+5:302023-09-17T20:51:17+5:30

गेल्या २४ तासांत केपे केंद्रात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या केंद्रात गेल्या २४ तासांत २.७ इंच पावसाची नाेंद झाली आहे.

Rainfall reached 115 inches, the highest in Kepe Center in 24 hours | पाऊस पोहोचला ११५ इंचावर, २४ तासांत केपे केंद्रात सर्वाधिक पाऊस

पाऊस पोहोचला ११५ इंचावर, २४ तासांत केपे केंद्रात सर्वाधिक पाऊस

googlenewsNext

नारायण गावस -

पणजी : गेला आठवडाभर राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडत आहे . गेल्या २४ तासांत केपे केंद्रात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या केंद्रात गेल्या २४ तासांत २.७ इंच पावसाची नाेंद झाली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस येलोव अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे ऐन चतुर्थीत पावसाची रिमझिम असणार आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ११५ इंच पावसाची नोंद झालेली आहे. यात सर्वाधिक जास्त पाऊस केपे केंद्रात झाली आहे. केपे केंद्रात आतापर्यत १३० इंच पावसाची नाेंद झाली आहे. त्याच्याखालोखाल सांगे केंद्रात १२७ इंच पावसाची नाेंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात १२१ इंच पावसाची नाेंद झाली आहे. राजधानी पणजीत १०८ इंच पावसाची नाेंद झाली आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा गोव्याला थेट फटका बसत आहे. गणेश चतुर्थीच्या काळात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात समुद्रात जाेराचे वारे वाहणार असल्याने मच्छिमाऱ्यांनी खाेल समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे ऐन चतुर्थीतीच्या सणाला पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

- ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी
यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. पण जुलै महिन्यात पावसाने प्रमाण वाढले होते. यंदा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झाला असला तरी जुलैमध्ये माेठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सर्व पाण्याची पातळी भरुन काढली. पुन्हा ऑगस्टमध्ये पावसाची कमतरता जाणवली. आता गेले आठवडाभर सर्वत्र हलका पाऊस पडत असला तरी पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 

 

Web Title: Rainfall reached 115 inches, the highest in Kepe Center in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.