राजीव चंद्रशेखर यांनी घेतली निलेश काब्राल यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 09:04 AM2024-01-06T09:04:55+5:302024-01-06T09:05:16+5:30

काब्राल यांना हल्लीच मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावल्याने कुडचडेंतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अजूनही काहीशी नाराजी आहे.

rajeev chandrasekhar met nilesh cabral | राजीव चंद्रशेखर यांनी घेतली निलेश काब्राल यांची भेट

राजीव चंद्रशेखर यांनी घेतली निलेश काब्राल यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा भेटीवर असलेले भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रभारी केंद्रीय आयटीमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल कुडचडेंत आमदार निलेश काब्राल तसेच तेथील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी काम करण्याची ग्वाही त्यांनी काब्राल व त्यांच्या कार्यकर्त्याकडून घेतली आहे.

काब्राल यांना हल्लीच मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावल्याने कुडचडेंतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अजूनही काहीशी नाराजी आहे. ती वरवर दिसत नसली तरी अंतर्गत खदखद आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जे १४० मतदारसंघ अवघ्या काही मतांच्या फरकाने भाजपसाठी हुकले त्या मतदारसंघांमध्ये विशेष निवडणूक प्रभारी नेमले आहेत. चंद्रशेखर यांनी दक्षिण गोवा प्रभारी म्हणून याआधीच्या भेटीत दक्षिण गोव्यातील काही विधानसभा मतदारसंघांना भेटी दिल्या होत्या.

काल त्यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासोबत सांगेचा दौरा केला. तेथे वासुदेव मॅग गांवकर यांच्या घरी दुपारचे भोजन घेतले. कार्यकर्त्यांना भेटून ते कुडचडेला काब्राल यांच्याकडे गेले. सायंकाळी नुर्वेत मंत्री आलेक्स सिक्वेरा व तेथील भाजप कार्यकर्त्यांना भेटले. तेथे ख्रिस्ती धर्मगुरुंनाही ते भेटले. प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, तुळशीदास नाईक, आनंद भगत वगैरे मंडळी होती.
 

Web Title: rajeev chandrasekhar met nilesh cabral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.