गोव्यातील रालोय गोळीबार प्रकरण: मुख्य म्होरक्या निलेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत

By सूरज.नाईकपवार | Published: November 17, 2023 05:10 PM2023-11-17T17:10:17+5:302023-11-17T17:12:52+5:30

संपत्तीच्या वादातून गोळीबाराची वरील घटना घडली होती. कोन्सी फर्नांडीस या या प्रकरणातील तक्रारदार आहेत.

Raloy firing case in Goa: Chief leader Nilesh sent to judicial custody | गोव्यातील रालोय गोळीबार प्रकरण: मुख्य म्होरक्या निलेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत

गोव्यातील रालोय गोळीबार प्रकरण: मुख्य म्होरक्या निलेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यातील सासष्टीतल्या रालोय कुडतरी येथील गोळीबार प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्याला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी कोलवाल येथील न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

संपत्तीच्या वादातून गोळीबाराची वरील घटना घडली होती. कोन्सी फर्नांडीस या या प्रकरणातील तक्रारदार आहेत. संशयित ब्लॅक टायगर या सुरक्षा एजन्सीचा मालक आहे. तो व त्याचे अन्य दोन साथिदार कारमधून घटनास्थळी आले होते. त्यातील एकटयाने पिस्तुलातून तीन गोळया झाडल्या होत्या. सीसीटिव्ही कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झाला होता.

पोलिसांनी नंतर निलेशला अटक केली होती. त्याचे अन्य दोन साथिदार अजूनही फरार आहेत. बुधवार दि. १ नोव्हेबर राेजी रात्री अकराच्या दरम्यान वरील घटना घडली होती. घटनास्थळी पोलिसांना दोन गोळया सापडल्या होत्या. वापरलेले पिस्तुलही पोलिसांना अजूनही सापडलेले नाही.

तक्रारदाराच्या १५ वर्षीय मुलाने संशयिताने आपण बालक्नीत असताना आपल्या दिेशेने राेखून गोळीबार केल्याची जबानी पोलिसांत दिली हाेती. भादंसंच्या ३३६, शस्त्रात कायदा तसेच बाल सुरक्षा कायदयातंर्गत पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले होते.

दरम्यान संशयित निलेशने बाल न्यायालयात केलेल्या जामिन अर्ज पुढच्या सोमवारी सुनावणीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Raloy firing case in Goa: Chief leader Nilesh sent to judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.