राज्यात राम नवमी उत्साहात: राजकीय नेत्यांनी घेतले रामाचे दर्शन

By पूजा प्रभूगावकर | Published: April 17, 2024 04:59 PM2024-04-17T16:59:59+5:302024-04-17T17:01:57+5:30

राज्यात राम नवमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

ram navami excitement in the state political leaders take darshan of lord shri rama | राज्यात राम नवमी उत्साहात: राजकीय नेत्यांनी घेतले रामाचे दर्शन

राज्यात राम नवमी उत्साहात: राजकीय नेत्यांनी घेतले रामाचे दर्शन

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: राज्यात राम नवमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित भाटले -पणजी, गिमोणे - डिचोली, कोलवाळ, म्हापसा, वास्को आदी विविध ठिकाणी अलेल्या राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.

राम नवमी निमित विविध मंदिरांमध्ये राम जन्माचा सोहळा पार पडला. यानिमित मंदिरे विद्युत रौषणाईने सजावण्यात आले होते. सकाळपासूनच महापूजा,आरती, महाप्रसाद तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले.यावेळी मंत्री, आमदार तसेच राजकीय नेत्यांनी मंदिरात जावून दर्शन घेतले. विशेष म्हणजे कॉंग्रेसकडून उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूकीची उमेदवारी सादर करण्यापूर्वी उमेदवार ॲड. रमाकांत खलप व त्यांच्य कार्यकर्त्यांनी कालेवाळ येथील राम मंदिरात जावून दर्शन घेऊन प्रार्थना केली.

दरम्यान राज्यातील काही मंदिरांमध्ये राम नवमी ते हनुमान जयंती पर्यंत आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यात संध्याकाळी नाटक तसेच संगीत कार्यक्रमही ठेवले आहेत. पणजी बसस्थानक येथील मारुती मंदिरातही हनुमान जयंती पर्यंत सत्यनारायण पूजा, महाप्रसाद व अन्य कार्यक्रमांचा समावेश आहे.

Web Title: ram navami excitement in the state political leaders take darshan of lord shri rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.