रानडे यांच्या अस्थींचे बुधवारी गोव्यातील मांडवीत विसजर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 10:22 PM2019-07-02T22:22:55+5:302019-07-02T22:23:30+5:30
पणजी : गोव्याच्या मुक्ती संग्रामात असामान्य योगदान दिलेले व अलिकडेच वृद्धापकाळाने मरण पावलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या ...
पणजी : गोव्याच्या मुक्ती संग्रामात असामान्य योगदान दिलेले व अलिकडेच वृद्धापकाळाने मरण पावलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या अस्थींचा कलश आज बुधवारी पणजीत आणला जाणार आहे. येथील मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार या वेळेत लोक अस्थींचे दर्शन घेऊ शकतील. रानडे हे मूळचे सांगलीतील असले तरी, ते पुणो येथे स्थायिक झाले होते. पुण्यातच त्यांचे निधन झाले. गोवा मुक्तीनंतर काही वर्षानी ते पोतरुगालच्या तुरुंगातून सुटले. त्यानंतर काही वर्षे ते गोव्यात राहत होते. रानडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र व गोव्याने मिळून शासकीय इतमामात त्यांच्यावर पुणो येथे अंत्यसंस्कार केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून मिनेङिास ब्रागांझा संस्थेमध्ये सकाळी साडेअकरा वाजता अस्थी कलश स्वीकारला जाईल. सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर अस्थींचे मांडवी नदीत विसजर्न केले जाणार आहे. 1929 साली जन्मलेल्या रानडे यांचा मृत्यू वयाच्या 89 व्या वर्षी झाला. आझाद गोमंतक दल ह्या सश क्रांतिकारकांच्या संघटनेचे ते सदस्य होते. या दलाच्या सदस्यांनी शस्त्रे प्राप्त करून पोतरुगीजांविरुद्ध हल्ले केले. 2001 साली रानडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
स्व. विश्वनाथ लवंदे, प्रभाकर सिनारी आदी अनेकजण आझाद गोमंतक दलाचे सदस्य होते. रानडे यांनी आपल्या सहका:यांसोबत बेती पोलिस स्थानकावर हल्ला करून तेथील श साठा पळविला होता. त्यावेळी त्यांना बंदुकीची गोळी लागून गंभीर जखम झाली होती. त्यावेळीच पोतरुगीजांनी पाठलाग करून त्यांना पकडले होते. प्रथम त्यांना आग्वादच्या तुरुंगात ठेवले गेले होते. मग त्यांना पोतरुगालच्या तुरुंगात ठेवले गेले होते.