बलात्कार प्रकरणात आमदार बाबूशसह मुलीच्या आईस पोलीस कोठडी
By admin | Published: May 6, 2016 06:50 PM2016-05-06T18:50:03+5:302016-05-06T18:50:03+5:30
सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यास शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 6- येथील सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यास शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ईशान्येकडील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी बाबूश याच्यावर दाखल केलेला आहे. आपल्या सावत्र आईने आणि मावशीने आपल्याला 50 लाख रुपयांना विकल्याचा जबाब संबंधित मुलीने दिलेला आहे. या आईसही पोलिसांनी गजाआड केले आहे. बाबूशसह तिलाही तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी दोघांनाही दहा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, या प्रकरणाची माहिती माध्यमांना देण्यास मनाई करावी, अशी विनंती बाबूश याने न्यायालयास केली आहे. (प्रतिनिधी)