अल्पवयीन युवतीवर बलात्कार: संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By सूरज.नाईकपवार | Published: March 7, 2024 12:10 PM2024-03-07T12:10:17+5:302024-03-07T12:10:28+5:30
एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर बलात्कार प्रकरणात गोव्यातील कोलवा पोलिसांनी अटक केलेला प्रशांत बस्तवडकर (२३) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मडगाव: एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर बलात्कार प्रकरणात गोव्यातील कोलवा पोलिसांनी अटक केलेला प्रशांत बस्तवडकर (२३) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयापुढे उभे केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर संशयिताला कोलवाळ तुरुंगात पाठवून देण्यात आले.
प्रशांतला कोलवा पोलिसांनी शेजारच्या बेळगाव जिल्हयातील नंदगड येथे पकडले होते. त्याच्याविरोधात भादंसंच्य ३५४,३६३,३७६,३८३,५०६,३२३,५११, गोवा बाल कायदा कलम ८ (२) व बाल संरक्षण कायद्यातंर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.
पिडिताच्या पालकाने कोलवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. संशयिताने अनेकदा त्या मुलीवर खानापुर, बेळगाव तसेच गोव्यात बलात्कार केला होता. तसेच तिची आक्षेपार्ह फोटो काढून हे फोटो सोशल मिडियावरुन व्हायरल करण्याची धमकी दिली होती. हे फोटो डिलिट करायचे असेल तर पैसेही मागितले होते.