प्रशासकीय भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले : मुख्यमंत्री
By admin | Published: May 8, 2015 01:14 AM2015-05-08T01:14:36+5:302015-05-08T01:14:58+5:30
पणजी : ‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सहा महिन्यांच्या काळात किंवा गेल्या अडीच वर्षांच्या एकूण कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे पू
पणजी : ‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सहा महिन्यांच्या काळात किंवा गेल्या अडीच वर्षांच्या एकूण कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे पूर्ण उच्चाटन झाले, असे मी म्हणणार नाही; पण प्रशासनात भ्रष्टाचार निश्चितच कमी झाला आहे,’ असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीस शुक्रवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी खास ‘लोकमत’ला मुलाखत दिली. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे.
ॅ गेल्या सहा महिन्यांत शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार कमी झाला, असे तुम्हाला वाटते का?
- भ्रष्टाचार निश्चितच कमी झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत किंवा तत्पूर्वी अडीच वर्षांच्या काळात एकाही मंत्र्यावर किंवा सरकारमधील आमदारावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. गेले काही दिवस काँग्रेसवाले हे सरकार भ्रष्ट सरकार आहे, असे म्हणत आहेत. मात्र, सरकार भ्रष्ट आहे म्हणजे नेमके काय, ते विरोधी पक्ष सांगत नाही. नेमक्या कोणत्या प्रकरणात कुणी कसा भ्रष्टाचार केला आहे, ते काँग्रेस सांगत नाही; कारण सांगण्यासाठी त्या पक्षाकडे काहीच नाही. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड पूर्ण नष्ट झाली, असे मी म्हणत नाही. मात्र, भ्रष्टाचार हा सर्वच स्तरांवर कमी झाला अहे. जर मंत्र्यांच्या पातळीवर भ्रष्टाचार कमी झाला किंवा तो शून्य प्रमाणावर आला, तर मंत्र्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांवरही बंधन येते. वचक निर्माण होतो.
(पान ७ वर)