कारागृहातील रावण अधिक्षकांनाही भोवणार ?

By काशिराम म्हांबरे | Published: October 28, 2023 02:37 PM2023-10-28T14:37:02+5:302023-10-28T14:37:12+5:30

कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात  कैद्यांना  रावणाची प्रतिकृती  तयार करुन त्याचे दहन  करण्यास परवानगी देण्याचा प्रकरणाला वेगळे वळण लाभण्याची शक्यता आहे.

Ravana in the prison will also attack the superintendent? | कारागृहातील रावण अधिक्षकांनाही भोवणार ?

कारागृहातील रावण अधिक्षकांनाही भोवणार ?

काशिराम म्हांबरे

म्हापसा - कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात  कैद्यांना  रावणाची प्रतिकृती  तयार करुन त्याचे दहन  करण्यास परवानगी देण्याचा प्रकरणाला वेगळे वळण लाभण्याची शक्यता आहे.  कारागृहाचे अधिक्षक गौरेश कुट्टीकर यांनीच सामान आणण्यासाठी इतर अधिकाºयांना लेखी परवानगी दिल्याचे स्पष्ट झालेआहे.  त्यामुळे कारागृहाच्या महा निरीक्षकांनी त्यांच्याकडून या विषयावर स्पष्टीकरण मागितले आहे.  सध्या या प्रकरणात कारागृहातील  चार अधिकाºयांवर कारवाई करुन त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आलेआहे पण आदेशावर सही करणाºया कुट्टीकरांवर कसल्याच प्रकारची कारवाईअद्यापही करण्यात आलेली नाही.

कुट्टीकर यांनी १९ आॅक्टोबर रोजी आपल्या सहिनीशी दिलेल्या आदेशात रावणाची प्रतिकृती तयार करण्यास लागणारे सामान आणण्याची परवानगी दिली होती. त्यात फटाक्यांचाही समावेश होता. या सामाना सोबत कै द्यात वाटण्यासाठी गोड पदार्थ आणण्याची सुचनाही करण्यात आलेली. आणण्यात येणाºया सामानाची कसून चाचणी घेण्यासही सांगण्यात आले होते. दरम्यान सेवेतून निलंबीत करण्यात आलेल्या त्या अधिकाºयांनी कारागृहाच्या महानिरीक्षकांची भेट घेऊन आपली म्हणणे महानिरीक्षकांसमोर मांडले आहे.

Web Title: Ravana in the prison will also attack the superintendent?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.