मडगाव अर्बनच्या आर्थिक व्यवहारांवर आरबीआयची टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:20 PM2019-05-03T17:20:25+5:302019-05-03T17:20:53+5:30
2 मे पासून निर्बंध सुरु : ठेवीदारांना केवळ 5 हजाराची रक्कम काढण्याची मुभा
मडगाव: गोव्यातील सर्वात जुनी सहकारी बँक असलेल्या म्हापसा अर्बन बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून यापूर्वीच निर्बंध आणलेले असताना मडगावातील आर्थिक डबघाईला आलेल्या मडगाव अर्बन बँकेच्या सर्व व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 मे पासून निर्बंध आणले असून या बँकेला खातेदारांच्या ठेवीही घेण्यास बंदी आणली आहे. त्यामुळे या बँकेच्या दहाही शाखांत शुक्रवारपासून व्यवहार ठप्प झाला. या बँकेतून खातेदाराला केवळ पाच हजार रुपये काढण्याची मुभा दिली असून हे निर्बंध नेमक्या किती काळासाठी याची कुठलीही स्पष्टता नसल्याने खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात मडगाव अर्बनचे सर व्यवस्थापक किशोर आमोणकर यांच्याशी संपर्क साधला असता, हे निर्बंध पुढच्या सहा महिन्यांसाठी असून तोपर्यंत मडगाव अर्बन बँक दुसऱ्या बँकेत विलीन करण्यात येणार असल्याने खातेदारांनी चिंता करु नये असे त्यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी उशिरा आरबीआयचे परिपत्रक बँकेला पोचल्यानंतर शुक्रवारपासून सर्व शाखांतील कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, गुरुवारी मडगावातील व्यापा:यांकडून ज्या पिग्मी ठेवी वसूल करुन घेतल्या होत्या त्याही बँकेत भरण्यास नकार दिल्याने पिग्मी घेणा:यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.
आरबीआयचे कार्यकारी संचालक आर. सेबेस्तियान यांनी 26 एप्रिल रोजी हे परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार आरबीआयचा पुढील आदेश येईर्पयत मडगाव अर्बन बँकेला कुठल्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास, कर्ज देण्यास किंवा कुठल्याही आर्थिक संस्थेत गुंतवणूक करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली असून खातेधारकांना केवळ 5 हजार रुपयांर्पयत आपल्या ठेवीतील रक्कम काढण्यास मुभा दिली आहे.
कर्मचा:यांचे पगार, इतर प्रशासकीय खर्च, कायदेशीर खर्च वगळता अन्य कुठल्याही खर्चाला प्रतिबंध आणला असून बँकेचे कायदेशीर कामकाज सांभाळणा:या वकिलांनाही 5 हजार रुपयांपेक्षा अधिक फी देण्यास र्निबध आणले आहेत.
मडगाव अर्बन बँक ही गोव्यातील जुन्या सहकारी बँकेपैकी एक असून मडगावातील व्यापा:यांनी एकत्र येऊन या बँकेची स्थापना केली होती. स्थानिक व्यापा:यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभरित्या वित्त पुरवठा व्हावा या उद्देशाने ही सहकारी बँक स्थापण्यात आली होती. त्यामुळे मडगावच्या गाडेवाल्यांची बँक या नावाने तिला ओळखले जात असे. या बँकेमुळे मडगावातील कित्येक व्यापा:यांचा व्यवसाय स्थिरस्थावरही झाला होता.
मात्र मागच्या काही वर्षात बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनात गलथानपणा वाढल्यामुळे ही बँक आर्थिक डबघाईत आली होती. बँकेने दिलेल्या कर्जाची प्रभावी वसुली होत नसल्यामुळे तीन वर्षापूर्वीच आरबीआयने या बँकेवर कर्ज वितरण करण्यास बंदी आणली होती. तर सहा महिन्यापूर्वी बँकेकडून दिली जाणारी ओव्हर ड्राफ्ट सुविधाही बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता हा र्निबधाचा शेवटचा हातोडा आरबीआयने या बँकेवर हाणला आहे. गोव्यातील कित्येक खाण व्यावसायिकांना या बँकेने कर्ज दिल्यामुळे ती आर्थिक संकटात आल्याचे समजते. गोव्यात खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर या बँकेचे अर्थकारणही ढासळले होते.
विलिनीकरणासाठी प्रयत्न
आर्थिक डबघाईत आलेली ही बँक दुस:या बँकेत विलीन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून पीअॅण्डबी बँक आणि टीजेएसबी बँक या दोन बँकांनी ही बँक स्वत:त विलीन करुन घेण्यासाठी तयारी दाखवली आहे. मडगाव अर्बनचे सर व्यवस्थापक आमोणकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, या दोन्ही बँकांकडे सध्या बोलणी चालू असून येत्या सहा महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. बँकेची सर्व मालमत्ता आणि देणी यांच्यासह ही बँक दुस:या बँकेत विलीन होणार असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.