आरबीएल बँकेला गंडा घालणारा हरयाणात जेरबंद; पोलिस घुसले दहशतीच्या गावात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 03:37 PM2023-02-26T15:37:07+5:302023-02-26T15:37:58+5:30

हरयाणामधील मेवात या गुन्हेगारांची दहशत असलेल्या गावात जाऊन त्याला पकडून आणले.

rbl bank fraudster jailed in haryana goa police entered the village of terror | आरबीएल बँकेला गंडा घालणारा हरयाणात जेरबंद; पोलिस घुसले दहशतीच्या गावात

आरबीएल बँकेला गंडा घालणारा हरयाणात जेरबंद; पोलिस घुसले दहशतीच्या गावात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: आरबीएल बँकला ९.२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगाराच्या गोवा क्राइम ब्रँचच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. हरयाणामधील मेवात या गुन्हेगारांची दहशत असलेल्या गावात जाऊन त्याला पकडून आणले. संशयिताचे नाव हाकीत मोहम्मद असे असून, तो हरयाणा येथील आहे.

आरबीएल बँकेच्या पणजी शाखेतून ९.२ लाख रुपये काढले जातात. परंतु, ते कुणा ठेवीदाराच्या किंवा खातेदाराच्या खात्यातून वजा होत नाहीत, अशा प्रकारचा सर्वांना चक्रावून टाकणारा गुन्हा काही महिन्यांपूर्वी घडला होता. या प्रकारामुळे बँक अधिकारी आणि तपास अधिकारीही अचंबित झाले होते. परंतु, या प्रकरणाचा छडा लावण्यास क्राइम ब्रँचला यश मिळाले आहे. यासंदर्भातील तपासादरम्यान महत्त्वपूर्ण दुवा मिळाल्यावर क्राइम ब्रँचचे निरीक्षक देवेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथक हरयाणामध्ये दाखल झाले व आपले काम फत्ते केले. 

संशयिताला हुडकून काढून त्याला पकडून गोव्यात आणले. हेडकॉन्स्टेबल योगेश खांडेपारकर, कॉन्स्टेबल संयोग शेट्ये, इब्राहिम करोल, विनय आमोणकर आणि हेमंत गावकर हे या मोहिमेत सामील झाले होते. रात्रीच संशयिताला गोव्यात आणले होते. त्याला पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता सात दिवसांचा रिमांडही घेण्यात आला आहे.

पोलिस घुसले दहशतीच्या गावात

हरयाणामधील मेवात नावाचे असे एक गाव आहे, ज्या गावात गुन्हेगारांच्या टोळ्या आणि त्यांचे जाळेही आहे. अशा गावात जाऊन एखाद्याला पकडून आणणे हे कमी जोखमीचे काम नाही. सशस्त्र जवानांची सहा ते आठ वाहने त्यासाठी न्यावी लागतात. इतकेही करून काम होणारच याची शाश्वती नसते. कारण, असे लोक बचावासाठी पूर्वीच सर्व तयारी करून ठेवतात. पोलिसांच्या विरोधात मोठा जमावही ते जमवीतात. परंतु, व्यवस्थित नियोजन करून ते प्रत्यक्षात उतरविल्यामुळे क्राइम ब्रँचच्या पथकाला आपल्या मोहिमेत अडथळा आला नाही, असे अधीक्षक निधीन वालसान यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rbl bank fraudster jailed in haryana goa police entered the village of terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.