ख्रिस्ती मतदारांपर्यंत जा, त्यांचा विश्वास संपादन करा! गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, मंत्र्यांना बजावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:44 AM2023-04-18T08:44:24+5:302023-04-18T08:45:18+5:30
कोणत्याही परिस्थितीत दक्षिणची जागा मिळवायचीच असा चंग भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने बांधला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात या वेळी कोणत्याही परिस्थितीत भाजप उमेदवारच विजयी व्हायला हवा अल्पसंख्याकांची काँग्रेसची एक गठ्ठा त्यासाठी मते भाजपकडे वळवा. ख्रिस्ती मतदारांकडे जा. त्यांचा विश्वास संपादन करा, असे गोवा भेटीवर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना स्पष्टपणे बजावले आहे.
एकही ख्रिस्ती मतदार हातून सुटता कामा नये. प्रत्येकाकडे जा, त्यांचा विश्वास संपादन करा. यावेळी दक्षिण गोव्यातील जागाही आम्हाला जिंकायची आहे, असे शाह डिसेंबरमध्ये मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते तेव्हा त्यांनी सर्व भाजपच्या सर्व आमदार मंत्र्यांना असाच कानमंत्र दिला होता. आता शाह यांनी आमदारांना बजावले आहे. एकही ख्रिस्ती मतदार हातून सुटता कामा नये. प्रत्येकाकडे जा, त्यांचा विश्वास संपादन करा. यावेळी दक्षिण गोव्यातील जागाही आम्हाला जिंकायची आहे, असे शाह यांनी सांगितले आहे.
अल्पसंख्याकांना चुचकारण्याचे भाजपचे धोरण आता आणखी गती घेणार आहे. मोदीजींनी कानमंत्र दिल्यानंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आर्चबिशपना भेटले. मोदीजींचे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही चर्च संस्थेकडे चांगले संबंध ठेवले आहेत. चर्चच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याची जागा अवघ्या काही मतांनी भाजपला गमवावी लागली होती. सासष्टी तालुका हा ख्रिस्तीबहुल आहे. काँग्रेसकडे असलेली ही एक गठ्ठा मते यावेळी भाजपकडे वळलीच पाहिजेत, असा चंग शाह यांनी बांधला आहे. या दृष्टीने कामाला लागा, अशा सक्त सूचनाच त्यांनी केल्या आहेत.
भाजप देणार ख्रिस्ती उमेदवार ?
कोणत्याही परिस्थितीत दक्षिणची जागा मिळवायचीच असा चंग भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने बांधला आहे. तशा सूचना राज्यातील मंत्री, आमदारांनाही केल्या आहेत. दक्षिण मतदारसंघाचा विचार करता भाजप यावेळी दक्षिणेत एखाद्या ख्रिस्ती उमेदवाराचाही विचार करु शकतो. अशी चर्चा आहे की, चर्चिल आलेमांव किंवा दक्षिणेतील अन्य एखाद्या ख्रिस्ती नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. चर्चिल भाजपच्या संपर्काति आहेत.
समीकरणे बदलणार
- दुसरीकडे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी लुडमिन फालेरो काँग्रेसमध्ये होते.
- फ्रान्सिस सार्दिन यांचाही त्यावेळी प्रभाव होता. आता लुइझिन कॉंग्रेसमध्ये नाहीत. तसेच सार्दिन यांचाही प्रभाव उतरलेला आहे.
- काँग्रेस यावेळी सार्दिन यांना तिकीट देतील की नाही याबाबत साशंकता आहे.
- आणखी एक बाब म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडे काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावर युती असल्याने राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार चर्चिल आलेमाव यांचाही कॉंग्रेसला फायदा झाला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"