वयाची ५५ वर्षे गाठली, पण हिंमत न हरता ४ हजार चौ. मी.मध्ये कलिंगड लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:57 PM2023-02-14T12:57:32+5:302023-02-14T12:58:44+5:30

वयाच्या ५० व्या वर्षी नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली आणि शेतीकडे वळले.

reached 55 years of age but without losing courage 4 thousand sq cultivation of watermelon | वयाची ५५ वर्षे गाठली, पण हिंमत न हरता ४ हजार चौ. मी.मध्ये कलिंगड लागवड

वयाची ५५ वर्षे गाठली, पण हिंमत न हरता ४ हजार चौ. मी.मध्ये कलिंगड लागवड

Next

ख्रिस्तानंद पेडणेकर, लोकमत न्यूज नेटवर्क

केपे: करमलीवाडा काकोडा कुडचडे येथील शेतकरी जॉन फर्नांडिस यांनी त्यांच्या स्वतःच्या जागेवर शेती, बागायती करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी उत्तम प्रेरणा दिली आहे. वयाच्या ५५ वर्षीही त्यांची उमेद कायम आहे. तब्बल ४ हजार चौ.मी.मध्ये कलिंगड लागवड ते करत आहेत.

जॉन फर्नाडिस यांनी कदंब को ऑपरेशन लिमिटेडमधून वयाच्या ५० व्या वर्षी नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली आणि शेतीची निवड केली. नंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कृषी क्षेत्रात सुरुवात केली. भेंडी, आळसाने, कोबी, झेंडूची फुले आणि इतर स्थानिक भाज्यांची लागवड केली. नंतर त्यांच्या काही वैयक्तिक कारणांनी कोल्हापूर येथे गेले असता त्यांनी कलिंगडची लागवड पाहिली. तेथे त्यांनी टरबूज लागवडीची प्रक्रिया जाणून घेतली आणि नंतर त्यांनी त्यांच्या शेतात कलिंगड लागवड करण्याचे प्रयत्न केले. आज त्यांनी ४ हजार चौरस मीटर क्षेत्रात कलिंगडची लागवड केली आहे... करमली वाडा, काकोडा येथील जॉन फर्नांडिस हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने वय न बघता शेतीकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करून स्वताची एक ओळख केली आहे. मार्केटमध्ये स्वतःच्या रिक्षाने ते कलिंगड विक्री करायला जातात. कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात त्यांना त्यांचा मुलगा आणि पत्नी मदत करत आहे.

आता ४ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित

सुरुवातीला मी कोल्हापुरातून रोपे खरेदी केली. १० डिसेंबर २०२२ रोजी लागवड केली. लागवडीनंतर ६० दिवसांनी उत्पन्न मिळू लागले. माहिती १ कलिंगडचे वजन सुमारे ४-५ किलो आहे. ठिबक सिंचन पद्धतीने पिकाला आम्ही पाणी देतो. तसेच खत पाण्यात मिसळून पिकाला दिले जाते. पॉलिमल्चिंगद्वारे तणांचे नियंत्रण केले जाते. गेल्या वर्षी २ हजार चौ. मी. मध्ये लागवड केली होती. चांगले पीक येत असल्याने या वर्षी क्षेत्र वाढवून ४ हजार चौ.मी केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख रुपयांचे उत्पन्न आता ४ लाख रुपये अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. - जॉन फर्नाडिस, केपे.

कृषी विभागाने त्यांना कुंपण, ठिबक सिंचन, लागवड साहित्य आणि अनुदानासाठी मदत केली आहे आणि केपे तालुक्यातील शेतकयांना केवळ ४ महिन्यांच्या कालावधीचे कलिंगड पीक घेण्याचे आवाहन केले आहे. ४००० चौरस मीटर क्षेत्रातून ४ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. आम्ही अनेक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक प्लॉट देऊन पारंपरिक पिके (धान) सोडून नवीन पिके घेण्यास प्रोत्साहन दिले आहे. केपेच्या शेतकन्यांना टरबूज लागवडीसाठी प्रात्यक्षिक देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणारी पिके घेण्यास आणि शेतीमध्ये स्वावलंबी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करणे हा केपे कृषी विभागीय कार्यालयाचा मुख्य हेतू असतो. कलिंगड पे मध्ये वाढू शकत नाही, असे पूर्वी दिसून आले होते. ते फक्त साळशेतमध्ये वाढू शकते, अशी एक कल्पना होती. परंतु जॉन यांनी हे दाखवून दिले आहे की, कलिंगड केपेतही चांगले वाढू शकते आणि चांगले पीक येऊ शकते. -संदेश देसाई, प्रादेशिक कृषी कार्यालय, केपे 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: reached 55 years of age but without losing courage 4 thousand sq cultivation of watermelon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा