सावधान..! उष्णता वाढत आहे, उष्माघातापासून बचाव करा! आराेग्य तज्ज्ञांकडून सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:29 PM2024-04-01T16:29:56+5:302024-04-01T16:32:44+5:30

एप्रिल महिन्यात तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे

Read tips from health experts on how to prevent heat stroke as the heat rises | सावधान..! उष्णता वाढत आहे, उष्माघातापासून बचाव करा! आराेग्य तज्ज्ञांकडून सल्ले

सावधान..! उष्णता वाढत आहे, उष्माघातापासून बचाव करा! आराेग्य तज्ज्ञांकडून सल्ले

नारायण गावस, पणजी गोवा: राज्यात ऐन मार्च महिन्यामध्ये तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सियसवर गेला. आता एप्रिल महिना सुरु झाल्याने हे तापमान यंदा ३६ ते ३७ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रचंड उष्णतेमुळे सध्या लाेकांना बाहेर फिरणे कठीण झाले आहे. सूर्य आग ओकल्याप्रमाणे उष्णता होत असून शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत उष्णतेने लाेक हैराण आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आराेग्य तज्ञांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही सुचना दिल्या आहे.

  • उष्णतेत हे करु नका!
  1. तीव्र उकाडा असल्याने दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका.
  2. वाढत्या उष्णतेत मद्यसेवन, चहा, कॉफी व उष्ण व फास्ट फुड पदार्थ खाणे टाळावे.
  3. वाहने बाहेर उन्हात पार्किंग करुन वाहनांमध्ये लहान मुले किंवा वयोवृद्ध नागरिकांना सोडून जाऊ नये.
  4. उन्हाळ्यात मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे टाळावे.
  5. दिवसभर एसीमध्ये राहणे टाळावे

 

  • उष्णतेच्या बचावापासून हे करा
  1. उष्णतेत पाणी आवश्यक असल्याने तहान नसल्यास पुरेसे पाणी प्या, प्रवास करतानाही सोबत पाणी घ्यावे.
  2. उन्हाळ्यात सॉफ्ट रंगाचे तसेच कॉटनचे कपडे वापरावे.
  3. घराबाहेर पडताना उन्हाच्या बचावासाठी गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरावे.
  4. उन्हाळ्यात अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे.
  5. फॅनचा वापर करा, थंड पाण्याने अंघोळ करा
  6. बाहेरील वारा घरात येण्यासाठी घराचे खिडक्या दारे खुली ठेवा.


उन्हाळ्यात आराेग्याचा समस्या उद्भवत असल्याने तळपत्या उन्हात जाऊ नये. तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे. आहारामध्ये जास्तीत जास्त फळांचा रस घ्यावा. हाेईल तेवढ थंड जागेवर राहण्याचा विचार करावा.
-डॉ. महेश वेर्लेकर

प्रचंड वाढलेल्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, जाणं अनिवार्य असेल तर टोपी/स्कार्फ डोक्याला बांधावा. उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी चंदन, वाळा, नागरमोथा, भीमसेनी कापूर अशी सुगंधी द्रव्ये उटणे किंवा लेप या स्वरूपात वापरावी.
-वैद्य कृपा नाईक

 

Web Title: Read tips from health experts on how to prevent heat stroke as the heat rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.