पर्वरी रायझिंग नोमोझोच्या पाचव्या आवृत्तीसाठी सज्ज; विविध वयोगटांना एकत्र आणण्याचा उद्देश

By समीर नाईक | Published: January 23, 2024 03:07 PM2024-01-23T15:07:44+5:302024-01-23T15:08:00+5:30

यंदा आर्म रेसलिंग सारखा नवीन उपक्रम आयोजित केला आहे

Ready for the fifth edition of Parvari Rising Nomozo | पर्वरी रायझिंग नोमोझोच्या पाचव्या आवृत्तीसाठी सज्ज; विविध वयोगटांना एकत्र आणण्याचा उद्देश

पर्वरी रायझिंग नोमोझोच्या पाचव्या आवृत्तीसाठी सज्ज; विविध वयोगटांना एकत्र आणण्याचा उद्देश

समीर नाईक, पणजी: पर्वरी रायझिंग (दि. २८) रोजी नोमोझोची पाचवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच, या व्यासपीठावर क्रीडा, सांस्कृतिक वारसा, स्थानिक कला, फिटनेस आणि हस्तकला यासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. नोमोझोचे विविध वयोगटातील लोकांना एका छत्राखाली एकत्रित आणण्याचे प्रमुख उद्देश आहे. 

यंदा आर्म रेसलिंग, सारखा नवीन उपक्रम आयोजित केला आहे. तसेच नोमोझोमध्ये, हेल्थ झोन अंतर्गत आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, साखर तपासणी आणि इतर तपासण्या होईल. यावेळी होमिओपॅथिक डॉक्टर, जनरल फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, डेंटिस्ट देखील उपलब्ध असणार आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे पुनर्वापर, हवामान बदल, उद्योग, नावीन्यपूरक शोध, आरोग्यसेवा, आंतरराष्ट्रीय सदस्यत्व, रस्ता सुरक्षा, ग्रामीण उपक्रम यासारख्या गोष्टींवर येथे चर्चा होणार आहे.

 यासोबत नोमोझोमध्ये प्रथमच फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रोनोमीच्या सहयोगाने खगोलशास्त्र विषयावर जागरूकता करण्यात येईल. येथे दोन दुर्बिणी लावल्या जाणार असून आणि शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले चंद्रयान आणि खगोलशास्त्राशी संबंधित इतर विषयांबद्दल विविध मॉडेल प्रदर्शित करण्यात येणार आहेत. इथे दिवसा, लोक आकाशगंगेचे काही भाग आणि संध्याकाळी चंद्राचे विविध टप्पे आणि नक्षत्रांचे निरीक्षण करू शकतात. तसेच, शाळकरी मुलांसाठी क्विझ, स्किट्स आणि इतर उपक्रम आयोजित केले आहे.

Web Title: Ready for the fifth edition of Parvari Rising Nomozo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा