मानवी दृष्टिकोण असलेले वास्तववादी चित्रपट करणे आवडते - अली असगर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 11:12 PM2017-11-23T23:12:05+5:302017-11-24T14:39:20+5:30

मला मानवी दृष्टिकोण असलेले वास्तववादी चित्रपट करणे आवडते, असे प्रतिपादन चित्रपट निर्माता अली असगर यांने गुरुवारी केले.

Realistic realistic view of human vision - Ali Asghar | मानवी दृष्टिकोण असलेले वास्तववादी चित्रपट करणे आवडते - अली असगर

मानवी दृष्टिकोण असलेले वास्तववादी चित्रपट करणे आवडते - अली असगर

Next

पणजी : मला मानवी दृष्टिकोण असलेले वास्तववादी चित्रपट करणे आवडते, असे प्रतिपादन चित्रपट निर्माता अली असगर यांने गुरुवारी केले. ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा : मीट द डायरेक्टर्स या चर्चासत्रात अली असगर आणि अभिनेता सायमन अल बज यांनी या महोत्सवात दाखविण्यात येणा-या त्यांच्या चित्रपटाविषयी सांगितले. असगर यांचा डिस्अ‍ॅपिअरन्स आणि सायमन यांचा द अदर साईड आॅफ होप हे चित्रपट दाखविण्यात येत आहेत.

डिस्अ‍ॅपिअरन्स हा २0१७ चा इराणी चित्रपट असून ७४ व्या व्हेनिस इंटरनॅश्नल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आणि याचवर्षी होणा-या टोरंटो इंटरनॅश्नल फिल्म फेस्टिव्हलमध्ये डिस्कव्हरी विभागात दाखविण्यात येत आहे. एका रात्री दोन प्रेमी जीव एका रुग्णालयातून दुस-या रुग्णालयात कसे धावत राहतात आणि त्यांच्यावर कोणता प्रसंग येतो, याचे चित्रण या चित्रपटात आहे. सायमन अल बाजू यांचा द अदर साईड आॅफ होप या चित्रपटाने बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळविलेला आहे. सिरियातून श्रणार्थींच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे.

Web Title: Realistic realistic view of human vision - Ali Asghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.