मंत्री गावडे-तवडकर यांच्यात समेटाचे प्रयत्न; भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 07:41 AM2024-05-29T07:41:13+5:302024-05-29T07:42:02+5:30

ते दोन्ही नेत्यांशी बैठकही करणार आहेत.

reconciliation efforts between govind gawde and ramesh tawadkar goa bjp state president will hold a meeting | मंत्री गावडे-तवडकर यांच्यात समेटाचे प्रयत्न; भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

मंत्री गावडे-तवडकर यांच्यात समेटाचे प्रयत्न; भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यामधील संघर्षाची पुन्हा एकदा ठिणगी उडाल्यामुळे दोन्ही नेत्यांना समजूत घालण्याचे प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी चालविले आहेत. ते दोन्ही नेत्यांशी बैठकही करणार आहेत.

श्रमधाम योजनेच्या मुद्द्यावरून गावडे आणि तवडकर यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. हा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा पक्षाध्यक्ष तनावडे हे दिल्ली येथे भाजपच्या प्रचारात व्यस्त होते. दिल्लीहून परतल्यावर मंगळवारी त्यांनी गावडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. परंतु याविषयी गावडे आणि तवडकर यांची भेट घेऊन चर्चा केली जाईल असे तानावडे यांनी सांगितले.

'श्रमधाम' योजनेच्या शुभारंभाच्या एकदिवस अगोदरच या संघर्षाला तोंड फुटले होते. एका सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री गावडे यांनी 'उटा'च्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर जाहीरपणे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रियोळ मतदारसंघात श्रमधाम योजनेतील कामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर मंत्री गावडे यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य केलेले नाही आणि तवडकर यांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही दोघांतील वितुष्ट मिटले नसल्यामुळे कधीही संघर्ष होऊ शकतो, हे जाणून घेत पक्षनेतृत्वाने समेट घडवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

गावडे यांची नाराजी

गावडे यांच्या प्रियोळ मतदारसंघात त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले मगोचे दीपक ढवळीकर यांच्या उपस्थितीत तवडकर यांनी श्रमधाम योजनेचे उद्घाटन केल्यामुळे गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

 

Web Title: reconciliation efforts between govind gawde and ramesh tawadkar goa bjp state president will hold a meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.