राज्यात दोन दिवस रेड अलर्ट : पाऊस शतकाच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 03:46 PM2024-07-18T15:46:43+5:302024-07-18T15:47:04+5:30
राज्यात आतापर्यंत ९२.४४ इंच पावसाची नाेंद झाली आहे.
नारायण गावस, पणजी: राज्यात गेले पंधरा दिवस पावसाचे थैमान सुरुच असूनही हवामान खात्याने आज गुरुवार तसेच उद्या शुक्रवारी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस असणार आहे. गेला आठवडाभर रेड अलर्ट असल्याने राज्यभर मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यात आतापर्यंत ९२.४४ इंच पावसाची नाेंद झाली आहे.
: वाळपई, सांगे, साखळीची शंभरी
राज्यातील वाळपई, साखळी आणि सांगे या केंद्रावर आतापर्यंत १०० इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपईत १ जून ते आतापर्यंत १०६.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सांगे केंद्रावर आतापर्यंत १०४.० इंच पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी केंद्रावर १००.७ इंच पावसाची नोंद झाली आहे. अन्य काही केंद्रावर १०० इंच पावसाच्या जवळ आली आहे. जुलै महिन्याच्या १७ दिवसात पावसाचे अर्धशतक पार केले आहे.
: पडझड पूरस्थिती कायम
गेले पंधरा दिवसात राज्यात जाेरदार पावसामुळे पडझड तसेच पुरस्थिती कायम आहे. गेल्या पंधरा दिवसात राज्यातील काही लोकांच्या घराच्या भिंती काेसळल्या घरावर झाडे पडली, तसेच लाेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे लोकांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे .तसेच शेतीबागायतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वित्त हानी झाली आहते. पावसाच्या या पडझडीमुळे गेल्या पंधरा दिवसात ५ जणांचा बळीही गेला आहे.