हवामान खात्याकडून गोव्यात ‘रेड अलर्ट’, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 07:04 PM2019-10-23T19:04:04+5:302019-10-23T19:08:40+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला असून, यामुळे उद्या शुक्रवारी हवामान वेधशाळेने ‘रेड अलर्ट’ दिला आहे.
पणजी : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला असून, यामुळे उद्या शुक्रवारी हवामान वेधशाळेने ‘रेड अलर्ट’ दिला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. वारे ताशी ४५ ते ५५ किलोमिटर वेगाने वाहणार असून वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. अति मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आज गुरुवारीही जोरदार पाऊस होईल.
येथील हवामान वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार म्हणाले की,‘ अरबी समुद्रात गोव्याच्या किनाºयापासून १५0 ते २00 किलोमिटर अंतरावर पणजी आणि रत्नागिरीच्या मध्ये हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो गतिमान होत आहे. किनाºयावर वेगाने वारे वाहील. आज गुरुवारी ‘आॅरेंज अलर्ट’ दिलेला सर्वत्र पाऊस होणार आहे.
पूर्वी २५ रोजी ‘आॅरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. मात्र आता ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. समुद्रातील कमी दाबाचा हा पट्टा पूर्व मध्य भागातून पूर्व ईशान्येकडे वळला आहे. शुक्रवारी एक -दोन ठिकाणी २0 मि.मि. पेक्षाही जास्त पाऊस कोसळू शकतो.
दरम्यान, मान्सूनोत्तर पावसाने या महिन्यात विक्रम केला आहे. नैऋत्त्य मान्सून माघारी परतला, आॅक्टोबर महिना संपत आला तरी अजून पाऊस चालूच आहे.
बुधवारी मध्यम प्रमाणात पाऊस झाला. सकाळपासूनच आभाळ दाटून आले होते व नंतर पावसाची रिपरिप सुरु झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते त्यामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही.