जल संवर्धनाविषयी 19 पासून पणजीत परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 08:55 PM2018-02-14T20:55:14+5:302018-02-14T21:03:54+5:30
भारतीय जलविषयक कार्य संघटनेच्या (आयवा) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे चेअरमन यू. पी. पार्सेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पणजी - भारतीय जलविषयक कार्य संघटनेच्या (आयवा) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे चेअरमन यू. पी. पार्सेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पार्सेकर म्हणाले की, या महिन्याच्या दि. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान कला अकादमीत ही परिषद होणार आहे. तीन दिवसीय परिषदेत ‘पाणी जीवनाचे अमृत’ हा विषय असून, मुख्यत्वे पाणी आणि वाया जाणारे पाणी यावरही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या परिषदेत पर्यावरणविषयक योजना आणि कायदेशीर बाबी, सार्वजनिक आरोग्य व सामाजिक संस्था व सरकार, पाणी व्यवस्थापन, जलस्रोत यांच्यावर प्रबंध सादर केले जाणार आहेत. या परिषदेसाठी आत्तार्पयत 95क् सदस्यांची नोंदणी झाली आहे. अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स, सिंगापूर आणि तैवान येथील पाणी व्यवस्थापनावर काम करणारे अभ्यासक सहभागी होणार आहेत.
ते पुढे म्हणाले की, राज्यात पाण्याचे व्यवस्थापन करणो महत्त्वाचे आहे. परिषदेत आंतरराष्ट्रीय जलविषय संघटनेचे संचालक डायने डी आरास, मुंबई आयआयटीचे प्रा. श्याम असोलकर यांचे व्याख्यान होणार आहे. या परिषदेत 65 स्टॉलचा सहभाग असेल, 81 प्रबंधांचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यातील विजेत्यांना बक्षीस दिले जाणार असून, या प्रबंधातील सूचना सरकारकडे सादर केल्या जातील. या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती राहील. समारोपास कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे उपस्थित राहतील. या पत्रकार परिषदेस आयवाचे सचिव व्ही. एस. सावंत, संयुक्त सचिव अनिल रिंगाणो, कोषाध्यक्ष आर. जी. देव, सह निमंत्रक जी. एम. नाईक नाव्रेकर यांची उपस्थिती होती.