गोव्यात बीफबंदीबाबत विहिंपकडून पुनरुच्चार
By admin | Published: April 16, 2017 10:20 PM2017-04-16T22:20:27+5:302017-04-16T22:20:27+5:30
विश्व हिंदू परिषदेच्या राममंदिर निर्माण संकल्प सभेत गोव्यात बीफबंदी करावी अशी मागणी परिषदेचे केंद्रीय सचिव आचार्य राधाकृष्ण मनोरी यांनी केली.
Next
ऑनलाइन लोकमत
वास्को, दि. 16 - येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या राममंदिर निर्माण संकल्प सभेत गोव्यात बीफबंदी करावी अशी मागणी परिषदेचे केंद्रीय सचिव आचार्य राधाकृष्ण मनोरी यांनी केली. आता मुस्लीम बांधवांनाही त्याचे महत्त्व पटले असून अनेक मुस्लीम संघटनाही त्याबाबत आग्रही असल्याचे सांगत दुर्गावहिनी गोमांस बंदीसाठी पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी बोलताना परिषदेच्या महासचिव साध्वी प्रज्ञा भारती म्हणाल्या की अयोध्येत राम मंदिर बांधायला सरकारची गरज नाही. संत समाज स्वबळावर राम मंदिर बांधेल. या ठिकाणी पूर्वी राम मंदिर होते हे नि:संदिग्धरीत्या सिद्ध झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.