सिली सोल्स बार स्मृती इराणींना दिलासा, अबकारी परवान्याला आव्हान देणारी याचिका आयुक्तांनी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 06:41 PM2022-10-20T18:41:07+5:302022-10-20T18:56:11+5:30

Smriti Irani: केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे नातेवाईक गोव्यात आसगांव येथे चालवत असलेल्या बार अँड रेस्टॉरंट प्रकरणी परवाना नूतनीकरणाला आव्हान देणारी याचिका अबकारी आयुक्तांनी फेटाळून लावली आहे.

Relief to Silly Souls Bar Smriti Irani, Commissioner dismisses petition challenging excise licence | सिली सोल्स बार स्मृती इराणींना दिलासा, अबकारी परवान्याला आव्हान देणारी याचिका आयुक्तांनी फेटाळली

सिली सोल्स बार स्मृती इराणींना दिलासा, अबकारी परवान्याला आव्हान देणारी याचिका आयुक्तांनी फेटाळली

Next

- किशोर कुबल|
पणजी  -  केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे नातेवाईक गोव्यात आसगांव येथे चालवत असलेल्या बार अँड रेस्टॉरंट प्रकरणी परवाना नूतनीकरणाला आव्हान देणारी याचिका अबकारी आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. इराणी यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु दुसरीकडे याचिका दराने आपण या निवड आला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे.

मृत व्यक्तीच्या नावावर अबकारी परवान्याचे नूतनीकरण केले गेले. ते ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी उपकारी आयुक्त नारायण गाड यांच्याकडे सादर केली होती.  गेले काही महिने या याचिकेवर सुनावणी चालू होती. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांची कन्या हा बार चालवत असल्याचा याचिकादाराचा दावा होता. मृत व्यक्तीच्या नावे बेकायदेशीररित्या अबकारी परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले, असे त्यांचे म्हणणे होते.

दरम्यान, बार मालक मयत अँथनी द गामा यांची पत्नी मर्लिन हिने परवाना हस्तांतरण करण्यासाठी सादर केलेला अर्ज आयुक्तांनी मंजूर केला आहे.
आयरीश यांनी 20 जून रोजी परवाना नूतनी गणनाला आव्हान देणारी याचिका आयुक्तांसमोर सादर केली होती.

हायकोर्टात आव्हान देणार - आयरीश यांनी केले स्पष्ट
दरम्यान, खोटे दस्तऐवज सादर करून तसेच खात्याची दिशाभूल करून अबकारी परवान्याचे नूतनीकरण करून घेण्यात आले, याकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचे आयरिश यांचे म्हणणे आहे. हा परवाना देताना अबकारी अधिकाऱ्यांकडूनही बऱ्याच त्रुटी राहिलेल्या आहेत. सिली सोल्स बार असलेली मालमत्ता एटऑल फूड अँड ब्रीवरेजिसला लीजवर दिल्याचे स्पष्टपणे दाखवून देणारे दस्तऐवज आम्ही सादर केले होते परंतु त्याकडेही आयुक्तांनी दुर्लक्ष केले, असे आयरिश यांनी सांगितले.

दिवंगत अँथनी द गामा यांनी १ जानेवारी २०२१ रोजी महिना ५० हजार रुपये भाड्याने दहा वर्षांसाठी ही जागा लीज वर दिली होती. ५ जानेवारी २०२१ रोजी अँथनी यांनी अबकारी परवान्यासाठी अर्ज केला. त्याआधीच ही मालमत्ता एटऑल फूड अँड ब्रीवरीजला लीज वर दिली गेलेली होती. ही कंपनी केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे पती झुबीन हे संचालक असलेल्या असलेल्या उग्राया मार्कण्टाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भागीदार आहे. जीएसटीही सिली सोल्सच्या नावावर असल्याचे दाखवणारी कागदपत्रे आम्ही आयुक्तांना सादर केली होती, त्याकडेही दुर्लक्ष केले असे आयरिश यांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Relief to Silly Souls Bar Smriti Irani, Commissioner dismisses petition challenging excise licence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.