धार्मिक मूर्ती तोडफोड प्रकरण:18 जानेवारीला निवाड्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 07:35 PM2018-11-23T19:35:46+5:302018-11-23T19:35:55+5:30

धार्मिक मूर्तीची तोडफोड करून गोव्यात दहशत माजविणा-या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या तडीपारसंबधी अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली.

Religious idol scandal: The possibility of judgment on January 18 | धार्मिक मूर्ती तोडफोड प्रकरण:18 जानेवारीला निवाड्याची शक्यता

धार्मिक मूर्ती तोडफोड प्रकरण:18 जानेवारीला निवाड्याची शक्यता

Next

मडगाव: धार्मिक मूर्तीची तोडफोड करून गोव्यात दहशत माजविणा-या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या तडीपारसंबधी अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी तारीक थॉमस यांच्यापुढे हे प्रकरण आज सुनावणीस आले. संशयितातर्फे युक्तिवाद करताना वकील ऐरिक कुतिन्हो यांनी आपला अशील तुरुंगात असताना दक्षिण गोव्यातील मडकई भागात क्रॉस मोडतोडच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर उत्तर गोव्यातही धार्मिक स्थळांची मोडतोड झाली होते असे सांगितले. बॉय कोठडीत असताना राज्यात घडलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड बाबत त्यांचे वकील कुतिन्हो हे आता माहिती हक्क कायदयांर्तगत माहिती मागणार आहे. पुढील सुनावणी 18 जानेवारी रोजी ठेवण्यात आली असून, त्या दिवशी ते आपल्याकडील माहिती सादर करणार आहेत. त्याच दिवशी बॉयच्या तडीपार संबधी निवाडा होण्याची शक्यता आहे.
बॉय याच्यावर दाखल झालेल्या गुन्हयाचे सदयस्थिती काय आहे हे कळवावे असे सरकारपक्षाला यापुर्वी सूचविले तसेच संशयिताच्या वकीलाला बॉय किती प्रकरणातून निदरेष सुटला आहे व त्याच्यावर सदया किती खटले प्रलंबीत आहे व त्या खटल्याची सदयस्थिती कळवावी असेही सूचित केले होते.
बॉय याच्यावतीने वकील ऐरिक कुतिन्हो यांनी मागील खेपेला बाजू मांडतांना आपल्या अशिलावर एकूण 19 गुन्हे नोंद झाले होते, त्यातील 12 प्रकरणात त्याची सुटका झाली आहे तर सात खटले सदया प्रलंबीत आहेत असे सांगितले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील व्ही.जे. कॉस्ता हे बाजू मांडीत आहेत.
बॉय याने तडीपार प्रक्रियेच्या सुनावणीच्या वेळी हजर रहावे असा समन्स जिल्हा प्रशासनाने बजाविला होता.दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी बॉय याला दक्षिण गोव्यातून तडीपार करण्यासंबधीची शिफारस केली होती. त्यासंबधी मागाहून बॉयला कारणो दाखवा नोटीसही बजाविण्यात आली होती. या नोटीसीला बॉयने आव्हान दिले होते. बॉयमुळे गावात दहशत निर्माण झाली असून, तुरुगांतून सुटल्यानंतर त्याने राजकारण्यावरही आरोप केले होते. या पाश्र्र्वभूमीवर पोलिसांनी त्याच्या तडीपारची शिफारस केली होती.
14 जुलै 2017 रोजी बॉयला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर सुमारे 150 धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप आहे. यातील काही प्रकरणात तो न्यायालयात निदरेषही सुटला आहे. कुडचडे येथील बॉय हा टॅक्सीची भाडी मारत होता. रात्रीच्यावेळी तो धार्मिक स्थळांची मोडतोड करीत असे असा पोलिसांचा आरोप होता. गोव्यात मागच्यावर्षी धार्मिक स्थळांची विशेषता क्रॉस मोडतोडीची अनेक प्रकरणो घडली होती. पोलिसांनी खास चौकशी पथक तपासासाठी तयार केले होते. पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नंतर बॉयला अटक केली होती.
 

Web Title: Religious idol scandal: The possibility of judgment on January 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.