डावखुरेपणाचा भेदभाव दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:18 AM2017-08-14T05:18:49+5:302017-08-14T05:18:49+5:30
डावखुरेपण ही एक नैसर्गिक बाब आहे, त्यांना कमी लेखू नये, उजवे व डावे असा भेदभाव दूर करा, असे आवाहन जगभरातील डावखुºया प्रतिभावंतांच्या पहिल्या संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी केले.
मडगाव (गोवा) : डावखुरेपण ही एक नैसर्गिक बाब आहे, त्यांना कमी लेखू नये, उजवे व डावे असा भेदभाव दूर करा, असे आवाहन जगभरातील डावखुºया प्रतिभावंतांच्या पहिल्या संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी केले.
लोटली येथील बिग फूट म्युझियममध्ये गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन झाले. इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबच्या नवीन अॅपचेही लाँचिंग झाले. लोकमतच्या गोवा आवृत्तीचे महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, संपादक राजू नायक, इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबचे संदीप विष्णोई, बिग फूटचे महेंद्र आल्वारीस उपस्थित होते.
डावखुºयांचे दोन्ही मेंदू काम करत असल्याने त्यांची वैचारिक क्षमता व हुशारी दुप्पट वाढू शकते, असे गावडे यांनी सांगितले. राजू नायक म्हणाले, पूर्वी डावखुरे म्हटले की कमीपणा वाटत असे. मात्र, आता हे दिवस कालबाह्य ठरूलागले आहेत. डावखुरे ही आजची शान आहे. महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी सर्वजण डावखुरे आहेत. डावखुरे ही एक नैसर्गिक बाब आहे. त्यासाठी सरकारने शाळांना एक परिपत्रक पाठवून द्यावे.
संदीप विष्णोई यांनी डावखुरेपणाला वैज्ञानिक कारणे असल्याचे सांगितले. डावखुरे लोक श्रीमंत व उच्च पदावर आहेत. १८५७ मध्ये स्वातंत्र्य संग्रामाची क्रांती घडविणारी राणी लक्ष्मीबाई याही डावखुºया होत्या.
महाभारतातील अर्जुनही डावखुराच होता, श्रीरामभक्त हनुमानाने लक्ष्मण मूर्च्छित पडल्यानंतर संजीवनी औषधासाठी द्रोणागिरी पर्वतच उचलून नेला तेही डावखुरेच होते, अशी त्यांनी माहिती दिली. पहिली ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या डावखुºया विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. जगात मान्यता मिळविलेल्या २१ डावखुºयांचे पुतळे संग्रहालयात उभारले जाणार आहेत.
डावखुरे ही आजची शान
पूर्वी डावखुरे म्हटले की कमीपणा वाटत असे. मात्र, आता हे दिवस कालबाह्य ठरूलागले आहेत. डावखुरे ही आजची शान आहे. महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी सर्वजण डावखुरे आहेत.