बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्यासाठी म्हापसा पालिका पोलिसांचे सहकार्य घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 05:07 PM2017-09-27T17:07:20+5:302017-09-27T17:11:57+5:30
जगभरात शुक्रवारच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यातल्या म्हापसा मार्केटात वारंवार होणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्याचा ठराव म्हापसा पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला.
म्हापसा- जगभरात शुक्रवारच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यातल्या म्हापसा माकेर्टात वारंवार होणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्याचा ठराव म्हापसा पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. बाजार समितीचे मार्केटसंबंधी मांडलेल्या अहवालावर चर्चा करताना हे ठरवण्यात आले. पालिकेची बैठक नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी गौरेश शंखवाळकर उपस्थित होते.
बाजार समितीने आपल्या अहवालात मासळी मार्केट, भाजी मार्केट, फळमार्केट तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे बसवण्याची शिफारस केली आहे. पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याची शिफारस करताना उघड्यावर होणाºया नैसर्गिक विधीवर नियंत्रण ठेवण्याची तसेच प्रवेशद्वारावर अतिक्रमण करून विक्री करणाºया पाव विक्रेत्यांना हटविण्याची शिफारस केली आहे. बाजारपेठेतील सर्व विक्रेत्यांना ओखळपत्रे देणे, फूटपाथवरील अतिक्रमणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटवणे तसेच रात्रीच्यावेळी बाजारपेठ सामानमुक्त करण्याची शिफारस करताना बाजारातील व्यवहारात सुसूत्रता आणण्याची शिफारस केली होती.
केलेल्या शिफारशींवर पालिकेच्या सदस्यांनी आपली विविध मते मांडली. काही सदस्यांनी पालिकेच्या कर्मचाºयांकडून सहकार्य मिळत नसल्याचे आरोप केले. पालिकेच्या वतिने होणारी अतिक्रमणे हटवून सुद्धा ती थांबत नसल्याने वाढत्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची मागणी सदस्यांच्या वतीने करण्यात आली. केलेली मागणी सर्वानुमते मंजूर करण्यात आली. पालिकेच्या वतिने म्हापसा पोलीस स्थानकातील उपअधीक्षकांना पत्र पाठवून बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्यास सहकार्य करण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला अशी माहिती नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी दिली.
म्हापसा पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या केंद्रीय कारागृहातील कचरा उचलण्यासाठी कारागृह व्यवस्थापनाने जबाबदारी उचलावी अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे. तसेच पत्र पालिकेच्या वतिने कारागृहाच्या महानिरीक्षकांना पाठवण्यात येणार आहे. सध्या कारागृतील कचरा गोळा करण्याचे काम पालिकेच्या वतिने करण्यात येत असते.