सहा खाणींच्या मान्यतेचे नूतनीकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 05:46 PM2018-01-01T17:46:27+5:302018-01-01T17:46:42+5:30
कोडली, शिगाव, शिरगाव, कोडली आदी ठिकाणी असलेल्या एकूण सहा खनिज खाणींच्या कनसेन्ट टू ऑपरटेचे नूतनीकरण करावे, असा निर्णय गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोमवारी पणजीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पणजी : कोडली, शिगाव, शिरगाव, कोडली आदी ठिकाणी असलेल्या एकूण सहा खनिज खाणींच्या कनसेन्ट टू ऑपरटेचे नूतनीकरण करावे, असा निर्णय गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोमवारी पणजीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या खनिज खाणी चालू स्थितीत आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खनिज खाणी चालविण्यासाठी हवा व जल कायद्यांतर्गत कनसेन्ट टू ऑपरेट घ्यावा लागतो. या सहा खाणींची मान्यता संपुष्टात येत होती, तथापि, मान्यतेचे नूतनीकरण करावे म्हणून सहा खाणींच्या कंपन्यांनी मंडळाकडे अर्ज केले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवे अध्यक्ष गणोश शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची विशेष बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी मान्यतेचे नूतनीकरण करावे असे ठरले. शेटगावकर यांनी लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही तत्त्वत: नूतनीकरण मान्य केले आहे. या खाणींविषयीचे विविध अहवाल आम्ही मागून घेतले होते. ते पाहिल्यानंतर मंडळाच्या बैठकीत या खनिज खाणींना मान्यता द्यावी अशा प्रकारचे एकमत झाले. तथापि, मंडळ कायदेशीर प्रक्रियेचे पालन करील व काही अटींसह कनसेन्ट टू ऑपरेट देईल, असे शेटगावकर यांनी स्पष्ट ्रकेले.
या सहा खाणींमध्ये बद्रुद्दीन मावानी, पांडुरंग तिंबलो इंडस्ट्रीज, व्ही. एम. साळगावकर अॅण्ड ब्रदर्स, सेझा मायनिंग कॉर्परेरेशन, व्ही एम साळगावकर आणि वेदांता लिमिटेड या कंपन्यांच्या खाणींचा समावेश आहे. साळगावकर यांची खाण वेळगे- सुर्ल येथे आहे तर बद्रूद्दीन मावानीची खाण केवणा येथे आहे. वेदांता व तिंबलो यांच्या खनिज खाणी कोडली येथे आहेत. या सहाही खनिज खाणींचे कनसेन्ट टू ऑपरेट दि. 31 डिसेंबर 2क्17 र्पयत मर्यादित होते. खास या खनिज खाणींच्या कनसेन्ट टू ऑपरेटविषयी निर्णय घेण्यासाठी मंडळाची विशेष बैठक सोमवारी सकाळी घेतली गेली.
1994 सालच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने दि. 3क् सप्टेंबर 2क्क्5 रोजी मावानी यांच्या खाणीला पर्यावरणविषयक मान्यता दिली होती. दि. 14 ऑगस्ट रोजी एका पत्रद्वारे ह्या ईसीची मुदत वाढवून देण्यात आली. पांडुरंग तिंबलो कंपनीला दि. 2क् ऑक्टोबर 2क्क्5 रोजी पर्यावरणविषयक दाखला दिला गेला होता व दि. 18 ऑक्टोबर 2क्क्7 रोजी मुदत वाढवून दिली गेली होती. व्ही. एम. साळगावकर अॅण्ड ब्रदर्स कंपनीच्या शिगाव येथील खाणीला दि. 28 मार्च 2क्क्6 रोजी ईसी देण्यात आली. शिरगावच्या सेझा खाणीला 28 मार्च 2क्क्6 रोजी मान्यता देण्यात आली. सेझा मायनिंगच्या शिरगाव खाणीला दि. 17 नोव्हेंबर 2क्क्5 रोजी ईसी मिळाली व दि. 17 सप्टेंबर 2क्क्7 रोजीच्या पत्रनुसार मुदत वाढवून दिली गेली. वेदांताच्या कोडली खाणीला 2क्क्6 च्या अधिसूचनेनुसार दि. 6 सप्टेंबर 2005 रोजी ईसी मिळाली व दि. 29 डिसेंबर 2क्क्8 रोजी ईसीला मुदतवाढही मिळाली.
दरम्यान, क्लॉड अल्वारीस यांच्या गोवा फाऊंडेशन संस्थेने या सर्व खनिज खाणींना कनसेन्ट टू ऑपरेट वाढवून दिला जाऊ नये, अशी मागणी केली होती. ओरीसा येथील खाणींविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ाचा संदर्भ गोवा फाऊंडेशनने दिला होता.