ताज एॅक्झोटिकामधील दोन सुट्सचे नूतनीकरण
By admin | Published: October 13, 2016 04:43 PM2016-10-13T16:43:03+5:302016-10-13T16:43:03+5:30
दक्षिण गोव्यातील ताज एक्झॉटिकामधील दोन सुट्सचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याच हॉटेलचा ब्रिक्स परिषदेसाठी जास्त वापर होणार आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 13 - दक्षिण गोव्यातील ताज एक्झॉटिकामधील दोन सुट्सचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याच हॉटेलचा ब्रिक्स परिषदेसाठी जास्त वापर होणार आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दामिर पुतीन हेही याच हॉटेलमध्ये राहणार आहेत. त्यांच्याकडून वापरले जाणारे सुट्स आता अतिशय सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी रात्री गोव्यात आगमन होणार आहे. 15 रोजी ब्रिक्स परिषदेस आरंभ होईल. ब्रिक्स परिषदेपूर्वी चोवीस तास अगोदर परिषदेसाठी वापरली जाणारी सर्व चारही हॉटेल्स तथा दाबोळी विमानतळ यांचा ताबा विशेष सुरक्षा व्यवस्थेकडून घेतला जाणार आहे. सीमा सुरक्षा दल, सीआयएफ, सीआरपीएफ आदी विविध तुकडय़ा गोव्यात दाखल झालेल्या आहेत. बुलेटप्रुफ वाहनेही येथे दाखल झालेली आहेत.
अकरा देशांचे प्रमुख ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. ताज एक्झॉटिकामध्ये देशातील चांगले स्वयंपाकी आणण्यात आले आहेत. 1983 साली चोगमवेळीही पाहुणचाराची काळजी ताज हॉटेल ग्रुपनेच घेतली होती. त्यावेळी स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. चोगमवेळी जशा तातडीने साधनसुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या, तशाच सुविधा आताही तयार करण्यात आल्या आहेत.