‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाजवरून आलेल्या ४७३ गोमंतकीय बांधवांचे अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 10:56 PM2020-06-30T22:56:18+5:302020-06-30T22:56:45+5:30

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता ‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाज मुंबई बंदरावर जाण्यासाठी झाले रवाना

The report of 473 cowherds from the Norwegian Escape ship is negative | ‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाजवरून आलेल्या ४७३ गोमंतकीय बांधवांचे अहवाल निगेटिव्ह

‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाजवरून आलेल्या ४७३ गोमंतकीय बांधवांचे अहवाल निगेटिव्ह

Next

वास्को: विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया ४७३ गोमंतकीय बांधवांना घेऊन आलेले ‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाज मंगळवारी (दि.३०) संध्याकाळी ७ वाजता येथून मुंबई बंदरावर जाण्यासाठी रवाना झाले. सोमवारी सदर जहाज गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाल्यानंतर यातून आलेल्या ४७३ गोमंतकीय बांधवांचे कोरोना विषाणूबाबत चाचणी केल्यानंतर यासर्वांचे अहवाल मंगळवारी ‘नेगेटीव्ह’ आले असून सदर बांधवांना जहाजावरून त्यांच्या घरी पाठविल्यानंतर हे जहाज मुंबई जाण्यासाठी रवाना झाल्याची माहीती एमपीटी चे वरिष्ठ वाहतूक उपव्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत यांनी दिली.

सोमवारी सकाळी ‘नॉर्वेजियन एस्केप’ नावाचे विदेशी जहाज सुमारे २५०० जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया बांधवांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले होते. ग्रीस, इजिप्त अशा राष्ट्रातील समुद्री मार्गावरून या जहाजाने प्रवास केल्यानंतर भारतातील गोव्याच्या मुरगाव बंदरात ते सोमवारी प्रथम दाखल झाले होते अशी माहीती एमपीटी चे वरिष्ठ वाहतूक उपव्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत यांनी दिली होती. जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया ४७३ गोमंतकीय बांधवांना या जहाजातून मुरगाव बंदरात आणल्यानंतर त्यांच्या येथे कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी नमूने घेण्यात आले होते. या सर्व बांधवांचे अहवाल ‘नेगेटीव्ह’ आलेले असल्याची माहीती जेरॉम क्लेमेंत यांनी मंगळवारी देऊन ‘एसओपी’ नियमांचे पालन करून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलेले असल्याचे सांगितले. नियमानुसार त्यांना घरी पाठवल्यानंतर काही दिवसासाठी त्यांना घरात कोरंन्टाईन होण्यास कळविलेले असल्याचे जेरॉम यांनी पुढे सांगितले. 

दरम्यान जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया ४७३ गोमंतकीय बांधवांचे अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर मंगळवारी ते आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाज मुंबई बंदरावर जाण्यासाठी रवाना झाल्याची माहीती क्लेमेंत यांनी दिली. या जहाजवर महाराष्ट्रा तसेच इतर काही भागातील विदेशी जहाजावर काम करणारे खलाशी बांधव असून त्यांना मुंबई बंदरावर सर्व सोपस्कार केल्यानंतर उतरविण्यात येणार असून नंतर हे जहाज फिलीपींन्स राष्ट्रात जाण्यासाठी मुंबईहून निघणार असल्याची माहीती जेरॉम क्लेमेंत यांनी शेवटी दिली. 

Web Title: The report of 473 cowherds from the Norwegian Escape ship is negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.