जंगलांमधील आगींच्या बाबतीत अहवाल पंतप्रधान कार्यालयात - मुख्यमंत्र्यांची माहिती
By किशोर कुबल | Published: March 15, 2023 07:32 PM2023-03-15T19:32:07+5:302023-03-15T19:32:15+5:30
पणजी- म्हादई अभयारण्यासह राज्यात अन्य भागांमध्ये वन क्षेत्रात ज्या आगिच्या घटना घडल्या त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे तसेच राष्ट्रीय आपत्ती ...
पणजी- म्हादई अभयारण्यासह राज्यात अन्य भागांमध्ये वन क्षेत्रात ज्या आगिच्या घटना घडल्या त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनानेही अहवाल सादर केलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.गोवेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात आगिची नवीन घटना घडलेली नाही.
वनमंत्री विश्वजित राणे यांनी व्टीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार आग विझविलेल्या ठिकाणी बारकाईने नजर ठेवली जात आहे. पुन्हा आग लागू नये याची दक्षता घेतली जात आहे. सत्तरी तालुक्यात देरोडें, सुर्ला-म्हादई आदी भागात नजर ठेवली जात आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने तसेच हलक्या सरींमुळे खोतिगांव, नेत्रावळी भागात दिलासा मिळाल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
वन क्षेत्रांमध्ये आगिच्या घटना घडू नयेत यासाठी ३५० जण तैनात आहेत.गेल्या काही दिवसात लागलेल्या आगी विझविण्यासाठी स्थानिकांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल वनमंत्र्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, आगिच्या काही घटनांचे कॉल्स अग्निशामक दलास काल आले त्यात पार्से,पेडणे येथे कोरड्या गवताला लागलेली आग तसेच कुडासें, वाळपई येथील आग आदी दुर्घटनांचा समावेश होता.