खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 08:52 AM2024-05-21T08:52:26+5:302024-05-21T08:53:14+5:30

पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या टुरीस्ट फेरीबोटीतून २४ पर्यटक व २ बोटीवरील कर्मचारी जलसफारीसाठी निघाले होते...

Rescue of 24 tourists from the rough sea, two hours of thrill | खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक

खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक

पणजी : राज्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसावेळी भरसमुद्रात २४ पर्यटक असलेली बोट अडकली. बोटीवर पर्यटकांसह दोन कर्मचारी असा २६ जणांचा गट होता. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत त्यांचे जीव वाचवले. मुरगाव बंदरनजीक दोनतास हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चालले होते.

पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या टुरीस्ट फेरीबोटीतून २४ पर्यटक व २ बोटीवरील कर्मचारी जलसफारीसाठी निघाले होते. भर समुद्रात बोट पोहचली असतानाच अचानक ढग दाटून वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे बोट चालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. खळवलेल्या समुद्रात अडकल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला. त्याचवेळी समुद्रात गस्त घालणाऱ्या तटरक्षक दलाच्या ‘सी १४८’ या जहाजाला ही पर्यटकांची बोट दिसली व त्यातील जवांनानी बोटीच्या दिशेने जात बचावकार्य सुरू केले. 

जीव वाचविल्याबद्दल मानले आभार
भर समुद्रात अडकलेल्या आपत्कालीन स्थितीतून सुखरुपरित्या बाहेर काढून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल ‘नेरुल पॅराडाईज’ या पर्यटन फेरीबोटीच्या प्रवक्त्यांनी तटलक्षक दलाचे आभार मानले आहेत.

बोटीतील इंधन संपले अन् संकट झाले गडद
- रविवारी संध्याकाळी ६.३० ते रात्री ८.३० असे दोन तास ‘रेस्क्यू ऑपरेशन’  चालले. फेरीबोटीतील इंधन संपल्याने समुद्रातच ही फेरीबोट बंद पडली. त्यामुळे संकट अधिक गडद झाले. 
- भारतीय तटरक्षक ही भारत सरकारची सागरी, किनारी सुरक्षा मजबूत करते. प्रतिकूल हवामानात बचाव कार्य करुन पर्यटकांचा जीव भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी वाचवल्याने त्यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

Web Title: Rescue of 24 tourists from the rough sea, two hours of thrill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.