येत्या विधानसभापूर्वी एसटी समाजाला आरक्षण : उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 04:41 PM2023-12-08T16:41:27+5:302023-12-08T16:44:21+5:30

गाेव्यातील एसटी समाजाच्या लोकसंख्येनुसार या समाजाला ४  जागांवर आरक्षण मिळणे गरजेचे आहे. तो आमचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले आहे.

Reservation for ST community before upcoming assembly: Information of Uta President Prakash Velip | येत्या विधानसभापूर्वी एसटी समाजाला आरक्षण : उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची माहिती  

येत्या विधानसभापूर्वी एसटी समाजाला आरक्षण : उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची माहिती  

पणजी (नारायण गावस) : एसटी समाजाला येत्या २०२७ च्या  विधानसभा निवडणूकीत आरक्षण मिळणार आहे. आम्हाला भाजप सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एसटी समाजाच्या शिष्टमंडळाला बोलावले असून लवकरच मुख्यमंत्री हे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत केंद्रीय नेत्यांकडे जाणार असल्याची माहिती उटाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

गाेव्यातील एसटी समाजाच्या लोकसंख्येनुसार या समाजाला ४  जागांवर आरक्षण मिळणे गरजेचे आहे. तो आमचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा आमचा लढा सुरु असून त्यामुळे येत्या निवडणूकीत आमचे उमेदवार असणार आहे. तसेच इतर ज्या एसटी समाजाच्या मागण्या आहे त्याही सरकार लवकर पूर्ण करणार आहे,  असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
एसटी समाजाच्या हक्कासाठी लढा असल्याने सर्व संघटनांना आमचा पाठींबा आहे. तो मग कुठल्याही राजकीय पक्षाचा असो. उटा संघटनेने हा लढा सुरु केला आहे.

त्यामुळे उटा या संघटनेतर्फे या समाजासाठी आम्ही अनेक उपक्रमही राबवित आहोत. त्यामुळे राजकीय आरक्षणासाठी लढत असलेल्या कुठल्याच संघटना आमचा विरोध नसून त्यांना पाठींबा दिला जात आहे, असेही यावेळी प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
 

Web Title: Reservation for ST community before upcoming assembly: Information of Uta President Prakash Velip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा