आमदार सावळांकडून मराठी राजभाषेसाठी ठराव
By admin | Published: July 19, 2016 07:31 PM2016-07-19T19:31:49+5:302016-07-19T19:31:49+5:30
मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव मांडण्याचे ठरविले आहे. ठरावाची प्रत त्यांनी काल
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव मांडण्याचे ठरविले आहे. ठरावाची प्रत त्यांनी काल मंगळवारी सरकारच्या विधिमंडळ खात्यास सादर केली.
सावळ यांनी यापूर्वी मराठी राजभाषेबाबतचे खासगी विधेयक विधिमंडळ खात्यास सादर केले होते. खात्याने त्यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी हे विधेयक अगोदर कायदा खात्याकडे पाठवले. तिथून अजुनही त्या विधेयकाची सुटका झालेली नाही. विधेयकाची प्रत कायदा खात्याकडेच आहे. यामुळे सावळ यांनी यावेळच्या अधिवेशनात ठराव मांडावा असा निर्णय घेतला व त्याविषयीची नोटीस मंगळवारी दिली. आपला ठराव कसा असेल ते सावळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी ठरावाची प्रतच विधिमंडळ खात्याला सादर केली आहे.
विधानसभा अधिवेशन येत्या 25 रोजी सुरू होत आहे. अधिवेशन तीन दिवस चालेल. शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस असतो. त्यावेळी आपल्याला ठराव मांडण्यास मिळावा, अशी सावळ यांची विनंती आहे. मराठी राजभाषेच्या चळवळीत सावळ यांनी यापूर्वी भाग घेतलेला आहे. मात्र त्यांनी मराठीसाठी ठराव आणल्यामुळे आता यापुढे त्यांचे सहकारी आमदार रोहन खंवटे व विजय सरदेसाई कोणती भूमिका घेतात याकडे मराठीप्रेमींचे लक्ष आहे. (खास प्रतिनिधी)