RSS बद्दल आदर, पण शाळेच्या माध्यम धोरणात बदल नाही : भाजपा
By admin | Published: September 12, 2016 06:49 PM2016-09-12T18:49:16+5:302016-09-12T18:49:16+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आम्हाला आदर आहे. मात्र भाजप हा स्वतंत्र राजकीय पक्ष असून प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आमच्या सरकारने स्वीकारलेल्या धोरणाबाबत आम्ही ठाम आहोत.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आम्हाला आदर आहे. मात्र भाजप हा स्वतंत्र राजकीय पक्ष असून प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आमच्या सरकारने स्वीकारलेल्या धोरणाबाबत आम्ही ठाम आहोत. त्यात अजून कोणताच बदल झालेला नाही, असे भाजपचे सरचिटणीस व दक्षिण गोव्याचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सोमवारी येथे सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना सावईकर म्हणाले, की गेल्या पावणो पाच वर्षाच्या कालावधीत आमच्या सरकारने अनेक कामे केली. आरोग्य विमा व अन्य महत्त्वाच्या योजनांद्वारे आम्ही लोकांर्पयत पोहचलो. 2क्17 सालच्या निवडणुकीवेळीही भाजपचाच विजय होईल.
सावईकर म्हणाले, की सबका साथ, सबका विकास असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र आहे. तो मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हाला समाजाच्या सर्व घटकांना सोबत न्यायचे आहे. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी सध्या सरकारने जे धोरण स्वीकारले आहे त्या धोरणासोबत भाजप आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या काही मागण्या असून भाभासुमं चळवळ करण्यास किंवा निवडणूक लढविण्यास स्वतंत्र आहे. लोकशाहीत प्रत्येकास तो हक्क आहे. नवेसंघचालक नाना बेहरे यांनी राज्यातील इंग्रजी शाळांचे अनुदान बंद व्हायला हवे, अशी मागणी आमच्याकडे केलेली नाही किंवा आमच्याशी तशी त्यांची चर्चाही झालेली नाही.
सावईकर म्हणाले,की मी स्वत: स्वयंसेवक आहे. मात्र मी भाजपचे काम करतो. रा. स्व. संघाची कार्यपद्धत आणि संघटन याविषयी आम्हाला आदर आहे. संघ ही जगातली मोठी आदरणीय संघटना आहे. शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आमच्या मनात कोणताच गोंधळ नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. 2क्17 साली भाजपचे सरकार हे विविध संस्था व संघटनांच्या सहकार्यामुळे अधिकारावर आले होते.
गडकरी प्रभारी
दरम्यान, गोव्याच्या भाजपसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आता प्रभारी आहेत, असे सावईकर यांनी सांगितले. येत्या 24 व 25 रोजी कालिकत येथे भाजपच्या राष्ट्रीय मंडळाची बैठक होत आहे. त्या बैठकीस भाजपचे सर्व मंत्री तसेच प्रमुख नेते अपेक्षित आहेत. कालिकत येथेच झालेल्या बैठकीवेळी स्व. दिनदयाळ उपाध्याय यांची 1976 साली जनसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. देशभर त्यांची जन्मशताब्दी 2क्16-17 साली साजरी करण्याचे भाजपने ठरवले आहे, असे सावईकर यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)