कोल्हापूरच्या फाईन आर्टसच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला फिल्म बाजारमध्ये प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 01:05 PM2017-11-26T13:05:49+5:302017-11-26T13:06:47+5:30

पणजी : फाईन आर्टसची पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरातील लघुपटकर्त्या तरुण मंडळींचा प्रवास आता पूर्ण लांबीच्या कथापटांकडे सुरू झालेला आहे.

Responses to the film market for artwork of Fine Arts students of Kolhapur | कोल्हापूरच्या फाईन आर्टसच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला फिल्म बाजारमध्ये प्रतिसाद

कोल्हापूरच्या फाईन आर्टसच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला फिल्म बाजारमध्ये प्रतिसाद

Next

संदीप आडनाईक
पणजी : फाईन आर्टसची पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरातील लघुपटकर्त्या तरुण मंडळींचा प्रवास आता पूर्ण लांबीच्या कथापटांकडे सुरू झालेला आहे. या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला इमेगो हा चित्रपट गोव्यामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)चा भाग असलेल्या एनएफडीसी संचलित फिल्म बझारमध्ये दाखविण्यात आला. या चित्रपटाचे जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले.

भारत, नेपाल व बांगलादेश येथून आलेल्या २०३ चित्रपटातून निवडण्यात आलेले २४ वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट फिल्म बाजारच्या व्हूइंग रूममध्ये दाखविण्यात आले. यातील सहा चित्रपटांना नावाजण्यात आले. त्यात इमेगोचा समावेश आहे. फिल्म बाजारमधील या चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक करण चव्हाण, विक्रम पाटील (पटकथा-दिग्दर्शन) आणि विकास डिगे (कार्यकारी निर्माता) हे उपस्थित होते. त्यांना येथे देश-विदेशातील चित्रपट प्रतिनिधींशी थेट संपर्क साधता आला. इमेगो चित्रपट आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दौºयासाठी सज्ज आहे.

दळवीज आर्टसचे करण चव्हाण, विक्रम पाटील, कलामंदिर महाविद्यालयाचे रावसाहेब चिखलवाळे, कलानिकेतन महाविद्यालयाचे विकास डिगे रहेजा, मुंबईचे विजय कुंभार अशी या चित्रपटाची कोअरटीम आहे. त्यांनी एकत्रितपणे या पूर्वी दगडफूल, पोल्युट, म्युट,अलोन अशा प्रत्ययकारी श्यभाषा असणाºया पुरस्कार विजेत्या लघुपटांची निर्मिती केलेली आहे.

आंतरिक सुंदरतेची जाणीव असे आशयसूत्र असणाºया इमेगो या चित्रपटामध्ये व्हिटिलिगो (श्वेत्र) असणाºया युवतीची मानसिक स्थित्यंतरे दर्शवली आहेत.नववास्तववादी शैलीत घडणाºया या चित्रपटामध्ये लाईफ अ‍ॅज इट इज अश्ी भूमिका घेतलेला आहे.त्यानुसार अभिनय शैली, दृश्यभाषा केली आहे. या कलात्मक चित्रपटाची निर्मिती अविराज फिल्मस एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने केली आहे. पोस्ट प्रोडक्शन निर्मिती कोल्हापुरातील पारस ओसवाल यांनी केली आहे. प्रोडक्शन डिझाईन रावसाहेब चिखलवाळे तर कार्यकारी निमार्ता विकास डीगे हे आहेत.

चित्रपट समीक्षक डॉ.अनमोल कोठाडिया यांचे ह्या टीमला मार्गदर्शन लाभले आहे.या चित्रपटामध्ये ऐश्वर्या घायदार(कोल्हापूर), अमोल देशमुख (मुंबई) यांनी मुख्य भूमिका केली आहे. आदर्श कुरणे (कोल्हापूर) या बालकलाकाराने केलेल्या कामाचे विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटाकरिता फिल्म अंड टेलीव्हीजन आॅफ इंडियाचे राकेश भिलारे (सहायक छायाचित्रण),राज जाधव(ध्वनी), दर्पण चावला (वेशभूषा), शैलेश कांबळे (रंगभूषा) यांनी सर्जनशील तांत्रिक सहयोग दिला आहे. वेगळ्या स्वरूपाच्या व कथेला पूरक काम मुंबईच्या अनिकेत मंगरुळकर याने केले आहे.


फोटो इमेगो पोस्टर आणि इमेगो फिल्म बाजार या नावाने पाठविले आहेत.

Web Title: Responses to the film market for artwork of Fine Arts students of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.