गोव्यात मखरांच्या सजावटीसाठी थर्माकॉलच्या वापरावर येणार निर्बंध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 01:30 PM2019-08-23T13:30:39+5:302019-08-23T13:41:53+5:30

गोव्यात गणेश चतुर्थीत थर्माकॉल वापरून केल्या जाणाऱ्या सजावटीवर आता निर्बंध येणार आहेत.

Restrictions on the use of thermocol for decoration in ganeshotsav in goa | गोव्यात मखरांच्या सजावटीसाठी थर्माकॉलच्या वापरावर येणार निर्बंध!

गोव्यात मखरांच्या सजावटीसाठी थर्माकॉलच्या वापरावर येणार निर्बंध!

Next
ठळक मुद्देगोव्यात गणेश चतुर्थीत थर्माकॉल वापरून केल्या जाणाऱ्या सजावटीवर आता निर्बंध येणार आहेत. विधानसभेत नुकतेच संमत झालेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर थर्माकॉलच्या वापरावरही निर्बंध येतील. गणेशोत्सवात थर्माकॉल वापरुन केल्या जाणाऱ्या सजावटीला यामुळे आळा बसेल, असा दावा केला जात आहे. 

पणजी - गोव्यात गणेश चतुर्थीत थर्माकॉल वापरून केल्या जाणाऱ्या सजावटीवर आता निर्बंध येणार आहेत. विधानसभेत नुकतेच संमत झालेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर थर्माकॉलच्या वापरावरही निर्बंध येतील. गणेशोत्सवात थर्माकॉल वापरुन केल्या जाणाऱ्या सजावटीला यामुळे आळा बसेल, असा दावा केला जात आहे. 

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘विधानसभेत संमत करण्यात आलेल्या ‘नॉन बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल अ‍ॅक्ट’ या कायद्यात प्लास्टिक बरोबरच थर्माकॉल वापरावरही निर्बंधांची तरतूद आहे. 
१ जानेवारी २0२0 पासून राज्यात प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आधीच जाहीर केले आहे. वरील विधेयकात प्लास्टिक पिशव्यांचा वापर, उत्पादन तसेच तो जाळल्यास दंड तसेच कैदेची तरतूद आहे. प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात जाळल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड आणि दुसºयांदा हाच गुन्हा केल्यास ५० हजार रुपये व ५ दिवस कैद अशा शिक्षेची तरतूद आहे. 

प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, आयात करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी ५० हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १ लाख रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी ३ लाख रुपये दंड व तीन महिन्यांपर्यंत कैद अशी शिक्षेची तरतूद आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर, विक्री केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी २५०० रुपये, दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास ३५०० रुपये व त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड आणि पाच दिवसांची कैद अशी शिक्षेची तरतूद केली आहे. या सर्व तरतुदी थर्माकॉलच्या वापरालाही लागू होतील. 

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तींबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न केला असता पीओपी मूर्तींवर बंदी आहे. परंतु अशा संशयास्पद मूर्तींचे नमुने आल्याशिवाय कारवाई करता येत नाही. हस्तकला महामंडळ मूर्तीकारांना अनुदान देते त्यांच्याकडे चित्रशाळांची माहिती उपलब्ध आहे. पीओपी मूर्तींचे नमुने त्यांनी सादर केल्यास आमच्या प्रयोगशाळेत ते तपासून पुढील कारवाई करता येते. 

‘हिंदु जनजागृती’चे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

दरम्यान, हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका यांची भेट घेऊन त्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कृती दल स्थापन करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. राज्यातील काही ठिकाणी अशा मूर्तींची विक्री होत असल्याचा समितीचा दावा आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यावर तरंगतात. त्यातून श्री गणेशाची विटंबना होते. 

यापूर्वी गोवा शासनाने प्लास्टर ऑफ परिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात आणि विक्री रोखण्यासाठी कृती दल स्थापन केले होते. यामध्ये पर्यावरण खाते, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, अबकारी खाते, व्यावसायिक कर विभाग आणि पोलीस खाते यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता, असे राज्य समन्वयक मनोज सोळंकी म्हणाले. 

‘चेक नाक्यांवर यंत्रणा हवी’

माजी आमदार दामू नाईक यांनी पीओपी मूर्तींवर बंदी यावी यासाठी सुरवातीपासून पाठपुरावा केला होता. त्यांना विचारले असता ते म्हणाले की, चेक नाक्यांवर पीओपी मूर्ती तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. पोलिस या मूर्ती तपासू शकत नाहीत कारण त्यांना त्याचे ज्ञान नसते त्यामुळे शेजारी राज्यांमधून अशा मूर्ती गोव्याच्या बाजारात येतात. सरकारने मूर्ती तपासण्याची यंत्रणा चेक नाक्यांवरच करायला उपलब्ध करायला हवी. 
 

Web Title: Restrictions on the use of thermocol for decoration in ganeshotsav in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.