जीपीएससीचा निकाल अर्धा टक्काही नाही
By admin | Published: March 7, 2017 01:44 AM2017-03-07T01:44:31+5:302017-03-07T01:44:49+5:30
पणजी : वादग्रस्त ठरलेल्या गोवा लोकसेवा आयोगाने कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून
पणजी : वादग्रस्त ठरलेल्या गोवा लोकसेवा आयोगाने कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून १०५६ उमेदवारांपैकी केवळ ५ विद्यार्थी आवश्यक गुणांसह उत्तीर्ण होऊ शकले. आयोगाच्या नियमबाह्य पद्धतीमुळेच असा भिकार निकाल लागल्याचा उमेदवारांचा आरोप आहे.
११ जागांसाठी हाती घेण्यात आलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत अर्धे उमेदवारही आयोगाला मिळू शकले नाहीत यासाठी आयोगालाच जबाबदार धरले जात आहे. जे ५ उमेदवार लेखी परीक्षेत यशस्वी ठरले आहेत त्यांना तोंडी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेत सर्वसामान्य वर्गातील उमेदवारांसाठी ६५ टक्के गुण हे उत्तीर्णसाठी होते. इतर मागासवर्गीयांसाठी ६० टक्के तर एसटी उमेदवारांसाठी ५५ टक्के उत्तीर्णसाठी गुण होते. आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या बाबतीत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी अर्धा गुण कमी केला जाणार असल्याची सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे. प्रत्यक्षात यूपीएससीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातात.