गोव्यात बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 10:47 PM2020-06-24T22:47:53+5:302020-06-24T22:50:34+5:30
कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या मिळून सुमारे १६,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे.
पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी २६ रोजी सायंकाळी ५ वाजता घोषित केला जाईल. गोवा बोर्डाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी ही माहिती दिली.
कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या मिळून सुमारे १६,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. लॉकडाऊमुळे बारावीच्या तीन विषयांची परीक्षा राहिली होती. ती २0 ते २२ मे या कालावधीत घेण्यात आली.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर जीसीईटी परीक्षा द्यावी लागते. अभियांत्रिकी आणि फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालय प्रवेशाकरिता जीसीईटी अनिवार्य आहे. जीसीईटी परीक्षा ४ व ५ जुलै रोजी होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका सोमवारी २९ रोजी संबंधित शाळांना मेल केल्या जातील. प्रत्यक्ष गुणपत्रिका ७ जुलैपासून शाळांमध्ये उपलब्ध होतील. ज्या संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.