दक्षिण गोव्यात 'सीमोल्लंघन' करा; लोकसभा निवडणुकीसाठी मडगावात भाजपकडून आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 01:21 PM2023-10-16T13:21:30+5:302023-10-16T13:22:11+5:30
यावेळी सर्व नेते हजर होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मडगावात रविवारी प्रदेश भारतीय जनता पक्षातर्फे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व नेते हजर होते.
बैठकीत निवडणुकीसंदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. मागील वेळी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपाला पराभूत व्हावे लागले होते. काँग्रेस पक्षाचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे विजयी झाले होते. देशभरात गेल्यावेळी ज्या ज्या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे, तो मतदारसंघ यावेळी काबीज करण्याचे उद्दिष्ट पक्षाने यापूर्वीच निश्चित केले आहे. मतदारसंघात पक्षातर्फे कामही केले जात आहे. त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
मडगावात झालेल्या रविवारच्या आढावा बैठकीत मंत्री रवी नाईक, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, आमदार गणेश गावकर, दाजी साळकर, उल्हास तुयेकर, माजी आमदार बाबू कवळेकर, भाजपाचे सरचिटणीस दामू नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, सर्वानंद भगत, प्रभाकर गावकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. आगामी काळात लोकसंपर्कावर अधिक भर देऊन बूथ स्तरावर मजबुतीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले. भाजपच्या वरिष्ठ स्तरावरूनही नेत्यांकडून या मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्याबाबतही पक्षाच्या स्तरावर येथील जागा जिंकण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले