बालकलाकारांच्या 'गीत रामायणा' द्वारे संस्कृतीला नवसंजीवनी: सदानंद तानावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:26 AM2023-04-24T10:26:09+5:302023-04-24T10:27:11+5:30

इब्रामपूर येथे ८० बालकलाकारांद्वारे नाटकाचे दर्जेदार सादरीकरण

revival of culture through geet ramayan by child artist said sadanand tanavade | बालकलाकारांच्या 'गीत रामायणा' द्वारे संस्कृतीला नवसंजीवनी: सदानंद तानावडे

बालकलाकारांच्या 'गीत रामायणा' द्वारे संस्कृतीला नवसंजीवनी: सदानंद तानावडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणेः आजच्या संगणक युगामध्ये वाचनसंस्कृती लोप पावते की काय? अशी भीती आहे. या काळात छोट्या बालकलाकारांना सोबत घेऊन गीत रामायण नृत्य यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणे ही एक चांगली जमेची बाजू असल्याचे उद्गार भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काढले.

इब्रामपूर येथील सातेरी विद्या मंदिर पटांगणावर माऊली क्रिएशन आणि कला संस्कृती खात्यांतर्गत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते. एकूण ८० बालकलाकारांना घेउन माउली क्रिएशन यांनी गीत रामायणाची निर्मिती केली होती. शिवानंद दाभोलकर व त्यांची टीम नेपथ्य प्रकाशयोजना आणि संकल्पना विकास कानोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गीत रामायण उत्कृष्टपणे सादर केले.

या वेळी व्यासपीठावर आमदार प्रवीण आर्लेकर, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक अशोक परब, मुख्याध्यापक नरेंद्र नाईक, जीएमआर कंपनीचे अधिकारी मिलिंद पैदरकर, सरपंच अशोक धाउसकर, माजी मुख्याध्यापक सुभाष सावंत. माऊली क्रिएशनचे अध्यक्ष दीपक शिरोडकर, पंच सदस्य राजाराम गवस, चंदन बांदेकर उपस्थित होते.

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, माऊली क्रिएशन संस्थेने उल्लेखनीय कार्य करण्यासाठी जी पावले टाकलेली आहेत. ती कौतुकास्पद आहे. नवीन कलाकार घडवण्याचा या संस्थेने प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार आर्लेकर यांनी केले. कला आणि संस्कृती खात्याचे संचालक अशोक परब, डॉ. उदय कडाळकर यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि स्मरणिकेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माजी मुख्याध्यापक सुभाष सावंत, माऊली क्रिएशन संस्थेचे अध्यक्ष दीपक शिरोडकर, महादेव गवंडी यांचीही समायोजित भाषणे झाली.

इब्रामपूरच्या इतिहासात प्रथमच भव्य रंगमंचावर ८० कलाकारांसह नाट्य, नृत्य, गीतरामायण याचे सादरीकरण झाले. यात संजोती जगदाळे, शेखर पणशीकर, दशरथ नाईक, यशवंत नाईक, सूरज शेटगावकर, श्रद्धा जोशी, प्रियांका दाभोलकर, संतोषी परब, प्रज्ञा कासकर, पूजा कासकर, कृतिका राणे यांनी गायनाचे काम पाहिले. त्यांना बाळकृष्ण मेस्त्री, शिवानंद दाभोलकर, दत्तराज च्यारी, रोहित बांदोडकर, केतन साळगावकर, हर्षद खर्डे, रामदास च्यारी, शिवम दाभोलकर आदींनी बांदोडकर, केतन साळगावकर, हर्षद खर्डे, रामदास च्यारी, शिवम दाभोलकर आदींनी यांनी आभार मानले.

सत्कार सोहळा 

या वेळी अमिता नाईक, निवृत्ती शिरोडकर, राजाराम गवस, फटु उगवेकर, पुरुषोत्तम शिरोडकर आदींचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. निकिता नामदेव शिरोडकर, निकिता दीपक शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. दीक्षा हरमलकर, पूजा खरात आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नृत्य दिग्दर्शन रुपा नाईक, निर्मला उजगावकर, गीतरामायण दिग्दर्शन विकास कांदोळकर यांनी केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: revival of culture through geet ramayan by child artist said sadanand tanavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.