भाजपकडून एसटी समाजाचा मतांसाठी वापर, आरजीचे मनोज परब यांचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:59 PM2024-01-24T15:59:43+5:302024-01-24T16:00:42+5:30

अद्यापही आरक्षणाचं आश्वासन पूर्ण केला नसल्याचा परब यांचा आरोप.

RG s Manoj Parab accuses BJP of using ST community for votes | भाजपकडून एसटी समाजाचा मतांसाठी वापर, आरजीचे मनोज परब यांचा आराेप

भाजपकडून एसटी समाजाचा मतांसाठी वापर, आरजीचे मनोज परब यांचा आराेप

नारायण गावस

पणजी: भाजप एसटी समाजाचा फक्त मतांसाठी वापर करत आहे. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात सर्व शिष्टमंडळाला दिल्लीत नेऊन एसटी आरक्षणावर केंद्रातील नेत्यांची भेट घेणार असे आश्वासन दिले होते. पण अजू्न ते पूर्ण झालेले नाही. भाजप एसटी समाजाची फक्त फसवणूक करत आहे, असा आरोप आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केला.

मनोज परब म्हणाले,  एसटी समाजाची मिशन पोलिटीकल रिर्जवेशन बॅनरखाली गेली अनेक वर्षांपासून राजकीय आरक्षणाची मागणी सुरु आहे. पण अजून या सरकारला ती पूर्ण करता आली नाही. २००३ मध्ये या समाजाला एसटीचा दर्जा मिळाला आहे. आता २० वर्षे झाली तरी याेग्य ते आरक्षण मिळत नाही. राज्यात एकूण ४० जागापैंकी किमान १० टक्के म्हणजे ४ जागा या एसटीसाठी आरक्षित असणे गरजेचे आहे. इतर राज्यामध्ये हे आरक्षण आहे. पण गाेव्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकार राज्य सरकारचे ऐकून घेत नाही तरीही राज्यातील भाजपचे सरकार आपण डबल इंजिन असल्याच्या बाता मारत आहेत. असा आरोपही मनाेज परब यांनी केला.

एसटी समाजावर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होत आहे. या जमातीच्या लाेकांच्या जमिनी हडप केल्या जातात. तसेच त्यांना फक्त खोटी आश्वासने दिली जात आहेत. पण अजून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फक्त  निवडणूका जवळ येतात त्यांना या लोकांना आरक्षणाचे आश्वासन दिली जाते पण पुन्हा त्याचा राजकारण्यांना विसर पडतो. आमच्या आरजी पक्षामध्ये अनेक एसटी समाजाचे युवक काम करत आहेत. या समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत असेचे आम्ही त्यांंच्या सोबत राहणार आहेत, असेही परब म्हणाले.

Web Title: RG s Manoj Parab accuses BJP of using ST community for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा