“भाजप सरकार घाबरले, म्हादईवर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय; तरीही पदयात्रा होणारच”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:27 PM2023-02-23T15:27:41+5:302023-02-23T15:30:24+5:30
म्हादई कर्नाटकला विकण्यासाठी गोव्यातील भाजप सरकार आतुर झाले आहे, अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई चळवळ अधिक मजबूत करणार आणि आम्ही कुणाला घाबरत नाही, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. पदयात्रा होणारच. आम्ही कायदेशीर सल्ला घेणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
पदयात्रा काढताना लोक आले आणि दादागिरी करायला लागले. लोकप्रतिनिधी असून आपल्याला अडविण्यात आले. यावरून भाजप सरकार घाबरले आहे हे स्पष्ट होते. एका स्थानिक पक्षाला राष्ट्रीय पक्ष घाबरला आहे. आमचा उद्देश केवळ लोकांमध्ये जागृती करण्याचा होता. विरोधकांना ऐकण्याची क्षमता सरकारमध्ये नाही, असे ते म्हणाले.
आमदार बोरकर यांनी सांगितले की, म्हादई विषयावर कुणी आवाज काढू पाहत आहे, तर त्याचा आवाज दाबला जातो. भाजप सरकारने पदयात्रा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले. म्हादय यात्रा काढू नये म्हणून १४४ कलम लागू केले आहे. हे कलम पुढील ६० दिवसांसाठी लागू केले आहे. राज्य सरकार कर्नाटकला म्हादय विकण्यासाठी आतुर झाले आहे. लोकांना जागृत करू नये, असा त्यांचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"