जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप
By पूजा प्रभूगावकर | Published: July 8, 2024 02:10 PM2024-07-08T14:10:10+5:302024-07-08T14:10:24+5:30
रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते पोलिसांनी बॅरेकेड घालून वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा
पणजी: राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जुने गोवे जलमय बनले आहे. गांधी सर्कल परिसरात रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आल्याने तेथील वाहतूक काही वेळासाठी सोमवारी सकाळी बंद ठेवण्यात आली होती.
जुने गोवेत बॅसिलिका ऑफ बॉम्ब जिजस, सेंट केथरल आदी विविध वारसा स्थळे आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी पर्यटक मोठया संख्येने येतात. परंतु रविवार व सोमवारी सतत पडणाऱ्या माेठया पावसामुळे पर्यटकांप्रमाणेच स्थानिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते पोलिसांनी बॅरेकेड घालून वाहतूकीसाठी बंद ठेवली. त्यामुळे वाहन चालकांची ही बरीच अडचण झाली.
गांधी सर्कल ते श्री वडेश्वर महादेव मंदिर हा रस्ता सोमवारी अक्षर:शा जलमय झाला होता. या परिसरात बसस्टॉप असल्याने अनेक लोक तेथे बसची वाट पाहण्यासाठी थांबतात. तसेच या परिसरात काही दुकाने देखील आहेत. मात्र रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला.बसेस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे लोकांना बस पकडण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली.