संजीवनी साखर कारखाना 100 वर्षे चालवा : सुदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 02:08 PM2020-10-09T14:08:13+5:302020-10-09T14:09:26+5:30
लोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला
पणजी : संजीवनी सहकारी साखर कारखाना हा गोव्यातील एकमेव साखर कारखाना आहे. गेली चाळीस वर्षे हा कारखाना चालला. यापुढेही शंभर वर्षे तो चालायला हवा, अशी अपेक्षा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते, विद्यमान आमदार व माजी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.
संजीवनी साखर कारखाना हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार अधिकारावर असतानाच चाळीस वर्षापूर्वी सुरू केला गेला होता. ढवळीकर यांनी कारखान्याची स्थिती आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न याचा अभ्यास केला आहे.
लोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला. त्यानंतर अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना बंद करणार नाही असे सूतोवाच माङयाकडे केले. मात्र पाच वर्षे आम्ही कारखाना चालवू, असे राज्यसभा खासदार व भाजप नेते विनय तेंडुलकर नुकतेच शेतक:यांशी बोलताना म्हणाले. तेंडुलकर यांचे हे विधान धक्कादायक आहे, असे ढवळीकर म्हणाले. कारखाना पाचच वर्षे का चालावा? तो पुढील शंभर वर्षे चालायला हवा. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात कारखाना सुरू झाला होता. ऊस उत्पादकांच्या काही हजार कुटूंबांची उपजिविका कारखान्यावर अवलंबून आहे. पाच कोटी रुपये खर्च करून कारखान्याच्या यंत्रसामुग्रीचे नूतनीकरण करा किंवा नवी यंत्रसामुग्री आणा असे मी सूचविले होते. मात्र सरकार ऐकले नाही. उलट गोव्याचा ऊस परराज्यातील कारखान्याकडे पाठविला गेला. त्यावर नऊ कोटींचा खर्च करण्यात आला, असे ढवळीकर म्हणाले. कारखान्याकडे अकरा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आहे. त्या जागेत दीडशे शेड्स बांधून बेरोजगार युवकांना तिथे गाईंचे पालन करण्याचे प्रशिक्षण द्यावे. ते दुध मग कारखान्याने विकत घ्यावे. तसेच काही जागेत गाईंसाठी चारा लागवडीची व्यवस्था करावी. आत्मनिर्भर भारताच्या सूत्रच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम राबवावा असे ढवळीकर यांनी सूचविले.