गोव्याच्या ग्रामीण भागांमध्ये 650 कोविड रुग्ण, 75 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 01:12 PM2020-08-10T13:12:36+5:302020-08-10T13:14:46+5:30

वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रत एकूण 1क्4 कोविडग्रस्त असल्याचे सरकारी आकडेवारी स्पष्ट करते. हे रुग्ण प्रत्यक्षात वाळपई शहरातील नव्हे तर सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत

In rural Goa, 650 Kovid patients, 75 died | गोव्याच्या ग्रामीण भागांमध्ये 650 कोविड रुग्ण, 75 जणांचा मृत्यू

गोव्याच्या ग्रामीण भागांमध्ये 650 कोविड रुग्ण, 75 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रत एकूण 1क्4 कोविडग्रस्त असल्याचे सरकारी आकडेवारी स्पष्ट करते. हे रुग्ण प्रत्यक्षात वाळपई शहरातील नव्हे तर सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेतसत्तरी तालुक्याच ग्रामीण भागात कोविडमुळे आतार्पयत दोन मृत्यू झाले. साखळी रुग्णालयाच्या क्षेत्रातील ग्रामीण भागातही दोन मृत्यू झाले. कुडणे व विर्डी-साखळी येथील इसमाचा मृत्यू यापूर्वी झाला आहे

पणजी : राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये एकूण सुमारे साडेसहाशे कोविड रुग्ण आहेत. सत्तरीपासून पेडणे व मयेपासून मडकई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रतील ग्रामीण भागांतील कोविडग्रस्तांची संख्या जर मोजली तर एवढय़ा संख्येने कोविड रुग्ण आढळून येतात. अर्थात तेवढेच किंवा त्याहून जास्त शहरी भागांत कोविडग्रस्त आढळतात असेदेखील म्हणता येते. आतार्पयत राज्यात जे 75 मृत्यू झाले आहेत, त्यापैकी सुमारे 15 मृत्यू हे ग्रामीण भागातील रुग्णांचे आहेत.

वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रत एकूण 1क्4 कोविडग्रस्त असल्याचे सरकारी आकडेवारी स्पष्ट करते. हे रुग्ण प्रत्यक्षात वाळपई शहरातील नव्हे तर सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. साखळी रुग्णालयाच्या क्षेत्रत 76 कोविडग्रस्त दाखविले जातात, त्यापैकी पन्नास टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. कोलवाळे आरोग्य केंद्राच्या ग्रामीण भागात एकूण 5क् कोविडग्रस्त आहेत. एका बार्देश तालुक्यातील काही ग्रामीण भागांचा विचार केला तर तिथे दीडशेहून जास्त कोविडग्रस्त असल्याचे निष्पन्न होते. बार्देश तालुक्यातील म्हापसा व पर्वरी ही दोन आरोग्य केंद्रे विचारात घेण्याची गरज नाही, कारण तिथे शहरी भागही आहे. मात्र शिवोली, कांदोळी, हळदोणा अशा अरोग्य केंद्रांच्या क्षेत्रत ग्रामीण भागच जास्त येतो. पर्वरीच्या क्षेत्रतही अनेक छोटी गावे येतात.शिवोलीच्या क्षेत्रत वीस तर कांदोळीच्या क्षेत्रत 71 कोविडग्रस्त आहेत. कोलवाळे आोग्य केंद्राच्या क्षेत्रतही बहुतांश गावेच येतात.
पेडणो तालुक्यातील कासारवण्रे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 11 कोविडग्रस्त आहेत. डिचोली तालुक्यातील मये आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत ग्रामीण भागातील लोकसंख्या येते. तिथे 24 कोविडग्रस्त आहेत. सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत बहुतांश ग्रामीण भाग येतो. तिथे पन्नास कोविडग्रस्त आहेत. तिच स्थिती धारबांदोडा आरोग्य केंद्राच्या ग्रामीण भागात ओ. तिथे 95 कोविडग्रस्त आहेत. मडकई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत शंभर टक्के गावातील लोकसंख्या येते. तिथे 39 कोविडग्रस्त आहेत. शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत जो ग्रामीण भाग येतो, तिथे 36 कोविडग्रस्त आहेत. सासष्टी व मुरगाव तालुक्यातही काही ग्रामीण भाग येतो.

सत्तरी तालुक्याच ग्रामीण भागात कोविडमुळे आतार्पयत दोन मृत्यू झाले. साखळी रुग्णालयाच्या क्षेत्रातील ग्रामीण भागातही दोन मृत्यू झाले. कुडणे व विर्डी-साखळी येथील इसमाचा मृत्यू यापूर्वी झाला आहे. बार्देश तालुक्याच्या ग्रामीण भागात तिघांचे मृत्यू झाले. सांगेत एका मृत्यूची नोंद झाली. तिसवाडीतील चोडणमध्ये एकाचा मृत्यू झाला.
 

Web Title: In rural Goa, 650 Kovid patients, 75 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.