रशियन ऑलिंपिकपटू महिलेला ड्रग्ससह गोव्यात अटक; ३० लाखांचा ड्रग्स जप्त

By वासुदेव.पागी | Published: April 29, 2023 05:31 PM2023-04-29T17:31:42+5:302023-04-29T17:36:18+5:30

तिच्यासह रशियन पोलीस हवालदार आणि एका स्थानिकालाही अटक करण्यात आली आहे.

russian olympian woman arrested in goa with drugs 30 lakhs drugs seized | रशियन ऑलिंपिकपटू महिलेला ड्रग्ससह गोव्यात अटक; ३० लाखांचा ड्रग्स जप्त

रशियन ऑलिंपिकपटू महिलेला ड्रग्ससह गोव्यात अटक; ३० लाखांचा ड्रग्स जप्त

googlenewsNext

वासुदेव पागी, पणजी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला असून हरमल येथे  मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. या छाप्यात  दोन रशियन लोकांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी एक रशियन ऑलम्पिकपटु महिलेचाही समावेश आहे. 

एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्यात श्वेतलाना वर्गानोव्हा असे अ सून ती एक जलतरणपटू असून तिने  1980 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले होते. तिच्या बरोबर असेला आंद्रे हा तिच्या बरोबर होता आणि ड्रग्स व्यवहार तोच हाताळत होता अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. त्यांच्या त्यांच्याकडे 30 लाख रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त करण्यात आला.  88 एलएसडी ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 242.5 ग्रॅम चरस, 1.440 किलो हायड्रोपोनिक विड, 16.49 ग्रॅम हॅश ऑइल, 410 ग्रॅम हॅश केक यासह विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 4.88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  एनसीबीने भारतीय आणि विदेशी चलने, बनावट कागदपत्रे, आयडी आणि हायड्रोपोनिक तण वाढवण्यासाठी लागणारी सामग्री देखील जप्त केली आहेत. 

माहिती होती

एक रशियन महिला गोव्यात ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात व्यवहार करीत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. एका रशियनला अटक केल्यानंतरच ही माहिती मिळाली होती. त्यानुसार हरमल येथे कारवाई क रण्यात आली आणि दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्यांच्या बरोबर एक आकाश नामक स्थानिक गृहस्थालाही अटक करण्यात आली. 

हा आकाश कोण

एनसीबीकडून पकडण्यात आलेला आकाश हा एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचेही आढळून आले आहे. गोव्यात तो रशियन कार्टेलचा प्रमुख म्हणून काम करीत होता. तशी माहिती मिळाल्यानंतरच एनसीबीकडून आकाशवर पाळत ठेवण्यात आली होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: russian olympian woman arrested in goa with drugs 30 lakhs drugs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.