सडा उपकारागृह पुन्हा सुरू होणार की इतिहासात जमा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 03:13 PM2019-04-08T15:13:03+5:302019-04-08T15:31:53+5:30

दोन वर्षापूर्वी सडा उपकारागृहाची इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर येथील कैद्यांना कोलवाळे हलविल्यानंतर अजून या इमारतीच्या दुरूस्ती अथवा नव्याने बांधण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

sada sub jail will start again or it will go in history | सडा उपकारागृह पुन्हा सुरू होणार की इतिहासात जमा होणार?

सडा उपकारागृह पुन्हा सुरू होणार की इतिहासात जमा होणार?

Next
ठळक मुद्देदोन वर्षापूर्वी सडा उपकारागृहाची इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर येथील कैद्यांना कोलवाळे हलविल्यानंतर अजून या इमारतीच्या दुरूस्ती अथवा नव्याने बांधण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.सडा उपकारागृहात १९४ कैद्यांना ठेवण्याची क्षमता असून हा कारागृह पुन्हा सुरू करण्यात येणार की तो इतिहासात जमा होणार असा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे.सडा उपकारागृहात एकूण १७ मोठ्या कोठड्या उपलब्ध असून येथे सुमारे १९४ कैद्यांना ठेवण्याची क्षमता होती.

पंकज शेट्ये

वास्को - दोन वर्षापूर्वी सडा उपकारागृहाची इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर येथील कैद्यांना कोलवाळे हलविल्यानंतर अजून या इमारतीच्या दुरूस्ती अथवा नव्याने बांधण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानकावरील आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास अथवा दक्षिण गोव्यातील विविध न्यायालयात सडा उपकारागृहातून कैद्यांना आणण्यास जवळ व चांगले ठरत होते. हा कारागृहच सध्या बंद असल्याने कोलवाळ कारागृहातून कैद्यांना दक्षिणेत आणण्यास जास्त वेळ लागण्याबरोबरच अन्य विविध प्रकारचे त्रास सुद्धा सोसावे लागत आहे. सडा उपकारागृहात १९४ कैद्यांना ठेवण्याची क्षमता असून हा कारागृह पुन्हा सुरू करण्यात येणार की तो इतिहासात जमा होणार असा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे.

दक्षिण गोव्यातील विविध प्रकरणातील कैद्यांना मुरगाव तालुक्यात असलेल्या सडा उपकारागृहात ठेवणे चांगले ठरत होते कारण या कैद्यांना येथून वास्को, मडगाव, फोंडा, काणकोण अशा विविध न्यायालयात उपस्थित करण्यासाठी जवळ पडत होते. सडा उपकारागृहात एकूण १७ मोठ्या कोठड्या उपलब्ध असून येथे सुमारे १९४ कैद्यांना ठेवण्याची क्षमता होती. सडा उपकारागृहाची इमारत धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २५ जानेवारी २०१७ सालात सदर कारागृह खाली करून येथे असलेले कैदी तसेच इतर सर्व काम काज कोलवाळे कारागृहात हलवण्यात आले होते. सडा उपकारागृहातील कामकाज हलवून दोन वर्षे तीन महीने उलटले तरी असून या इमारतीची दुरूस्ती अथवा गरजेचे असल्यास नवीन इमारत बांधण्याचे काम सुद्धा हातात घेण्यात आलेले नसल्याने सडा उपकारागृह पुन्हा चालू करण्यात येणार की तो इतिहासात जमा होणार असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. दक्षिण गोव्यातील न्यायालयीत कोठडीत असलेल्या कैद्यांना न्यायालयात सुनावणीच्या वेळी आणण्याकरीता जास्त वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी देऊन अनेक वेळा कैद्यांना कोलवाळ कारागृहातून दक्षीण गोव्यातील विविध न्यायालयात उपस्थित करण्यासाठी उशिर सुद्धा होत असल्याचे सांगितले. सडा उपकारागृहातील पूर्ण कामकाज कोलवाळे हलवण्यात आल्याने सडा उपकारागृहातील अधिकारी व कर्मचारी वर्गाला याचा बराच त्रास सोसावा लागतो. सडा उपकारागृह गोव्याचा महत्वपूर्ण कारागृह असून तो सध्या बंद ठेवण्यात आल्याने विविध प्रकारच्या निर्माण होत असलेल्या असुविधा दूर करण्यासाठी लवकरच पावले उचलून सदर उपकारागृह चालू करण्याची गरज आहे. सरकारला हा उपकारागृह सुरू करण्याची इच्छा आहे काय की तो कायमस्वरूपी बंद पाडण्यास पाहतात असा प्रश्न मागील दोन वर्षापासून बंद पडलेला उपकारागृह सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येत नसल्याने सध्या पडलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दिरंगाई?

दोन वर्षापूर्वी सडा तुरूंग राहण्यासाठी धोकादायक असल्याचे समजताच कैद्यांना कोलवाळे तुरूंगात हलविल्यानंतर या इमारतीच्या तपासणीचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. सदर इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याला त्या कंपनीने दिल्याची माहिती तुरूंग महानिरीक्षक आर.डी.मिरजकर यांनी देऊन तशाच्या तसाच तो अहवाल त्यांनी आम्हाला पाठविलेला असल्याचे सांगितले. इमारत धोकादायक असल्याने ती पाडून पूर्णपणे बांधणे गरजेचे आहे, की या इमारतीची दुरूस्ती शक्य आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांचा अहवाल आम्हाला अजून पाठविलेला नसून याबाबत काय करावे याची माहिती देण्यात यावी असे पत्र आम्ही सार्वजनिक विभागाला पाठविलेले असल्याचे मिरजकर यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खाते जेव्हा याबाबत अहवाल देणार नंतरच पुढची पावले उचलण्यात येणार अशी माहिती मिरजकर यांनी देऊन सडा उपकारागृह पुन्हा सुरू होण्यास दिरंगाई होण्यामागे सार्वजनिक बांधकाम खातेच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया एके प्रकारे त्यांनी व्यक्त केली. सडा उपकारागृह असणे गरजेचे असून तो सध्या बंद असल्याने विविध प्रकारची अनेक असुविधा निर्माण होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी मान्य केले.

दोन वर्ष उलटली

२५ जानेवारी २०१७ ला सडा उपकारागृहातील कैद्यांना कोलवाळे कारागृहात हलवण्यात आले होते. याच्या एका रात्रीपूर्वी (२४ जानेवारी २०१७) सडा उपकारागृहातील कैद्यात मोठा दंगा निर्माण होऊन यात विनायक कारबोटकर या कैद्याची हत्या सुद्धा झाली होती. यानंतर काही महिने चौकशीसाठी सदर उपकारागृह तपासणी यंत्रणांशी होता अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली, मात्र या घटनेला २ वर्षाहून जास्त काळ उलटला अन् अजून सडा उपकारागृह सुरू करण्याबाबत कुठल्याच हालचाली दिसून येत नसल्याने तो पुन्हा चालू होणार की नाही असा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.


 

Web Title: sada sub jail will start again or it will go in history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.