सदानंद तानावडेंचा वॉच! विधानसभा अधिवेशनाला उपस्थिती, गॅलरीत बसून पाहिली कामगिरी

By किशोर कुबल | Published: July 16, 2024 10:47 AM2024-07-16T10:47:50+5:302024-07-16T10:48:15+5:30

तानावडे यांना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.

sadanand shet tanavade attending goa assembly session | सदानंद तानावडेंचा वॉच! विधानसभा अधिवेशनाला उपस्थिती, गॅलरीत बसून पाहिली कामगिरी

सदानंद तानावडेंचा वॉच! विधानसभा अधिवेशनाला उपस्थिती, गॅलरीत बसून पाहिली कामगिरी

किशोर कुबल

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे विधानसभेच्या गॅलरीत बसले होते. सतीश धोंड महामंत्री असताना असेच विधानसभा गॅलरीत बसून मंत्री, आमदारांची कामगिरी पाहत असत. सोमवारी तानावडे यांना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. बहुधा सभागृहात केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा माफी कशी मागतात, हे बघायला तानावडे आले असावेत, एल्टन यांनी अखेरपर्यंत काही माफी मागितली नाही.

विधानसभा अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस गाजला तो सत्ताधानांमुळेच आमदार एल्टन यांच्याकडून मापरिची मागणी करीत केलेल्या गदारोळावरून सभापतींना दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले व त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाला एकही प्रश्न कामकाजात आला नाही. एसटींना राजकीय आरक्षण देण्याची मागणी करणारा ठराव नाकारल्याने एल्टन यांनी सभापतींविरोधात जे आक्षेपार्ह विधान केले होते, त्याबद्दल वास्कीचे आमदार दाजी साळकर यांनी हक्कभंग ठराव आणला. सभापतींचा तसेच सभागृहाचा अनादर, अपमान केल्याबद्दल एल्टन यांनी जाहीर माफी मागाती किंवा सभापतींनी त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी साळकर तावातावाने करू लागले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच अन्य सताधारी आमदारांनीही दाजी यांना साथ देत एल्टननी माफी मागायलाच हवी, असा आग्रह धरला. परंतु शेवटपर्यंत केपेच्या आमदाराने मोडेन पण वाकणार नाही' अशी भूमिका घेतली व माफी काही मागितली नाही.

विरोधी पक्षनेते यूरी आलेमाव हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिले. आम्ही कोणताच गुन्हा केलेला नाही. एल्टन यांनी आणलेला ठराव हा एसटी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आहे. हवे तर हक्कभंग कामकाजात घेऊन काय ती कारवाई करा. परंतु आम्ही माफी मागणार नाही', असे यूरी यांनी ठणकावून सांगितले. सभापती तवडकर यांनी आपण नेहमीच एसटी समाजाच्या हिताचीच कामे केलेली आहेत. १९९६ पासून आपण आदिवासी चळवळीत असल्याचे विरोधकांना सुनावले, तवडकर म्हणाले की, गावडा, कुणबी, वेळीप यांना एसटी दर्जा देण्यापासून मी आदिवासी मंत्री असतानापर्यंत व त्यानंतरही जी आदिवासीच्या हितासाठी कामे केलेली आहेत ती सर्वश्रुत आहेत. एसटींना राजकीय आरक्षणाच्या मागणीचा ठराव वाआधी आमदार गणेश गावकर यांनीही विधानसभेत आणला होता. तो संमत झालेला आहे. त्यामुळे आणखी नवा ठराव घेण्यात अर्थ नाही, तसेच यापूर्वी या विषयावर लक्षवेधी सूचनेवरही तब्बल दीड तास सभागृहात चर्चा झाल्याचे हवडकर म्हणाले.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई कामकाज नियमांवर बोट ठेवूनच बोलत असतात, विधानसभा अधिवेशनात मंत्र्यांनी प्रश्न विचारलेले असताना त्यांना उत्तरे मिळण्याच्या आधीच शिक्षण खात्याचे सचिव पत्रकार परिषद बोलावून बाहेर माहिती देतात. हा कामकाज नियम ६२ चा भंग असल्याचे सरदेसाईंचे म्हणणे होते. विजय यांनी या आणखी एका प्रकरणात हक्कभंग कारवाईची मागणी केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमात यांना चिंता आहे ती
कुंकवळीच्या चिपटन मेमोरियल नूतनीकरणाची. सरकार या स्मारकाबद्दल काहीच करत नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्यावर मुख्यःयांनी कुंकाळी येथील ९६ महानायकांच्या हौतात्म्यांचे धडे मौच पाठ्यपुस्तकात आणले. राज्य व राष्ट्रीय स्तरावर उचित स्थान दिले, असे यूरीना सुनावले. पुढील वर्षभरात या स्मारकाचे नूतनीकरण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आणि युरी शांत झाले.

 

Web Title: sadanand shet tanavade attending goa assembly session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.