प्रचाराच्या अंतिम दिवशी सदानंद तानावडेचा ताळगावमध्ये प्रचार, आमदार जेनिफर मोंसेरात यांचीही उपस्थिती
By समीर नाईक | Updated: May 5, 2024 16:03 IST2024-05-05T16:01:44+5:302024-05-05T16:03:08+5:30
सदानंद शेट तनवडे यांनी पणजी ताळगाव मतदार संघात हजेरी लावत ही कमतरता दूर केली.

प्रचाराच्या अंतिम दिवशी सदानंद तानावडेचा ताळगावमध्ये प्रचार, आमदार जेनिफर मोंसेरात यांचीही उपस्थिती
समीर नाईक, पणजी: लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्पा रविवारी संपत असल्याने गेल्या आठवड्याभारआत उत्तर आणि दक्षिण दोन्ही ठिकाणी मोठ मोठ्या स्टार राजकिय नेत्यांनी प्रचाराचा, जाहीर सभेंचा धडाकाच लावला होता. पण, पणाजी- तळगाव या भागात बाबुश मोंसेरात व श्रीपाद नाईक यांना वागळता इतर कुणीही भाजपचे नेते प्रचाराला आले नव्हते. मात्र शनिवार आणि रविवार या दोन दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तनवडे यांनी पणजी ताळगाव मतदार संघात हजेरी लावत ही कमतरता दूर केली.
सदानंद शेट तानवडे यांनी शनिवार पासून पणाजी व तळगातील काही भागात घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांच्या सोबत तळगावच्या आमदार जेनिफर मोंसेरात, जिल्हा पंचायत सदस्या अंजली नाईक, माजी सरपंच अग्नेल डीकुन्हा, जानू रोझरियो, माजी उपसरपंच रेघा पै, विद्यमान सरपंच मारिया फर्नांडीस, उपसरपंच सागर बांदेकर, पंच सिडनी बरेटो, व इतर पंच सदस्य उपस्थित होते.
प्रचार दरम्यान तानावडे यांनी लोकांना भाजपने आतापर्यंत जी विकासकामे केली आहे याची माहिती दिली. तसेच लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांनी विचारलेल्या प्रश्नाची देखील समाधानकारक उत्तरे दिली. दरम्यान स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला, व जास्तीस जास्त लोक मतदान करतील याची काळजी घेण्यास सांगितले.
ताळगावमध्ये सुरुवातीला श्रीपाद नाईक दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ताळगाव मार्केटला भेट देत विक्रेत्यांशी संवाद साधला होता. तानावडे येण्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ॲड. रमाकांत खलप यांनी आपला प्रचार केला होता.