सादिक बेळ्ळारी खून प्रकरण: सातवा संशयित मुज्जूचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत

By सूरज.नाईकपवार | Published: October 15, 2023 12:37 PM2023-10-15T12:37:51+5:302023-10-15T12:37:58+5:30

१ सप्टेबरला रुमडामळ येथे सादिक याची दिवसाढवळया त्याच्या घरात तो झाेपेत असताना खून करण्यात आला होता.

Sadiq Bellari murder case: Seventh suspect Mujju also sent to judicial custody | सादिक बेळ्ळारी खून प्रकरण: सातवा संशयित मुज्जूचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत

सादिक बेळ्ळारी खून प्रकरण: सातवा संशयित मुज्जूचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत

सूरज नाईकपवार 
 
मडगाव:
गोव्यात गाजलेल्या सादिक बेळ्ळारी खून प्रकरणातील सातवा संशयित मुझ्झफर हकीम उर्फ मुझ्झु याचीही कोलवाळच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.  १ ऑक्टोबर रोजी मायणा कुडतरी पाेलिसांनी त्याला सोनारवाडा राय येथे अटक केली होती.

१ सप्टेबरला रुमडामळ येथे सादिक याची दिवसाढवळया त्याच्या घरात तो झाेपेत असताना खून करण्यात आला होता. भगवती कॉलनीत दोन वर्षाच्या अगोदर मुझाहिद खानजादे याचा खून झाला होता. सादिकही या खूनात सहभागी होता. नंतर तो जामिनावर सुटला होता. या खूनाचा बदला म्हणून नंतर त्याचा गेम करण्यात आला होता.

या खून प्रकरणात कादर खानजादे, तौसिफ कडेमणी, जावेद पानवाले, सुलेमान सिंकदर , रिहाल पानवाले व कबीर खानजादे या सहाजणांना यापुर्वीच पोलिसांनी पकडले असून, सदया ते न्यायालयीन कोठडीत आहे. भादंसंच्या ३०२ व १२० ब कायदयातंर्गंत संशयितांवर गुन्हा नोंद आहे.

Web Title: Sadiq Bellari murder case: Seventh suspect Mujju also sent to judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.