२४ रोजी सुशासनावर "सागर मंथन " परिषद: मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांचा असेल सहभाग

By पूजा प्रभूगावकर | Published: December 19, 2023 01:31 PM2023-12-19T13:31:20+5:302023-12-19T13:31:28+5:30

दक्षिण गोव्यातील केळशी येथील नोव्हेटोल गोवा नोवा सिल्विया रिसोर्टस येथे ही परिषद सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान होईल.

"Sagar Manthan" Conference on Good Governance on 24th: Chief Minister, Union Ministers will participate | २४ रोजी सुशासनावर "सागर मंथन " परिषद: मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांचा असेल सहभाग

२४ रोजी सुशासनावर "सागर मंथन " परिषद: मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांचा असेल सहभाग

पणजी: पाचजन्य या राष्ट्रीय साप्ताहिक ने २४ डिसेंबर रोजी "सागर मंथन " या परिषदेचे आयोजन केले आहे. यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर सहभागी होऊ मार्गदर्शन करतील.

दक्षिण गोव्यातील केळशी येथील नोव्हेटोल गोवा नोवा सिल्विया रिसोर्टस येथे ही परिषद सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान होईल. गोव्यातील सुशासन असा या परिषदेचा विषय आहे. पाचजन्य या राष्ट्रीय साप्ताहीका चे संस्थापक तथा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांच्या जयंती निमित "सागर मंथन " चे आयोजन केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय रस्ता व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आदी मान्यवर यावेळी यात भाग घेऊन सुशासन, राजकारणी , भारताचे भवितव्य, पर्यावरण, कल्याणकारी योजना यावर बोलतील.

Web Title: "Sagar Manthan" Conference on Good Governance on 24th: Chief Minister, Union Ministers will participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.